AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ 5 महिन्यांत महापालिकेने बांधला पूल; पूर्व अन् पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग

महापालिकेच्या पूल खात्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पद्धतींचा वापर करून केवळ 5 महिन्यांच्या अल्पावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. mumbai Municipal bridge built

केवळ 5 महिन्यांत महापालिकेने बांधला पूल; पूर्व अन् पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 5:19 PM
Share

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागांतर्गत असणाऱ्या पवई परिसरात मिठी नदीवर साधारणपणे वर्ष 1940 च्या सुमारास बांधलेला एक जुना पूल होता. हा पूल अतिधोकादायक झाल्याने डिसेंबर 2020 मध्ये तोडण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या पूल खात्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पद्धतींचा वापर करून केवळ 5 महिन्यांच्या अल्पावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. (mumbai Municipal bridge built in just 5 months; important route connecting the eastern and western suburbs)

कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण

तब्बल 34 मीटर लांबीचा आणि 24 मीटर रुंदी असणाऱ्या या नव्या पुलाचे बांधकाम सुरू असताना महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांपैकी काहींना आणि सदर ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या आव्हानावर यशस्वीपणे मात करून पुलाचे बांधकाम विक्रमी वेळेत व नियोजनानुसारच पावसाळ्यापूर्वी करण्यात आले.

या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर एकमेकांना जोडणार

या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली. विशेष म्हणजे विक्रमी वेळेत म्हणजेच केवळ 5 महिन्यांत बांधण्यात आलेल्या पुलाबाबत आणि संबंधित कार्यवाहीबाबत उप आयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (पूल) राजेंद्रकुमार तळकर यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

फिल्टरपाडा परिसरातून जाणारा साकी विहार मार्ग

>> बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व उपनगरांमधील ‘एस’ विभाग आणि फिल्टरपाडा परिसरातून जाणारा साकी विहार मार्ग आहे. या मार्गाद्वारे पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी परिसराला जाता येते. याच मार्गादरम्यान असणा-या मिठी नदीवर वर्ष 1940 च्या सुमारास 20 मीटर लांबी आणि 7 मीटर रुंदी असणारा पूल बांधण्यात आला होता. >> मिठी नदीवर असणारा सदर पूल डिसेंबर 2020 मध्ये धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर लगेचच सदर पूल पाडण्यात आला. >> पूल पाडल्यानंतर लोकांची गैरसोय होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन पूल पाडण्यापूर्वी सदर ठिकाणी तात्पुरता भराव टाकून एक तात्पुरता रस्ता पर्यायी स्वरूपात बांधण्यात आला. या तात्पुरत्या रस्त्याची उभारणी झाल्यानंतर जुन्या पुलाचे पाडकाम करण्यात आले. >> सदर ठिकाणी नव्या पुलाचे बांधकाम हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित पद्धतींचा अवलंब करण्याचे निश्चित करण्यात आले. यानुसार या नव्या पुलाचे बांधकाम अक्षरशः दिवसरात्र पद्धतीने करण्यात आले. >> वरीलनुसार नव्या पुलाचे बांधकाम हे नुकतेच पूर्ण झाले असून, हा पूल वाहतुकीसाठी खुला झालाय. विशेष म्हणजे जुन्या पुलाची रुंदी ही केवळ 7 मीटर इतकी होती, या तुलनेत नव्या पुलाची रुंदी ही 24 मीटर इतकी आहे. म्हणजे जुन्या पुलापेक्षा हा पूल तिपटीपेक्षा अधिक रुंद आहे. तसेच पुलाची उंचीदेखील जुन्या पुलापेक्षा अधिक आहे. जुना पूल 6 मीटर उंच होता, तर नवीन पुलाची उंची 7 मीटर इतकी आहे. >> या पुलाच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांसाठी 1.2 मीटर रुंदीचे पदपथ देखील बांधण्यात आले आहे. तर पुलाच्या मध्यभागी सुमारे 2 मीटर रुंदीची जागाही जलवाहिन्या व अन्य उपयोगितांसाठी सोडण्यात आली आहे. तसेच पुलाच्या दोन्ही मार्गिकांच्या दोन्ही बाजूला संरक्षित भिंत बांधण्यात आलीय.

संबंधित बातम्या

5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, 18 जिल्ह्यातून लॉकडाऊन उठवला, तुमचा जिल्ह्यातील लॉकडाऊन कधी उठणार?

Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात 5 टप्प्यात शिथीलता देणार

mumbai Municipal bridge built in just 5 months; important route connecting the eastern and western suburbs

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.