AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kabutar Khana Controversy : आमच्या अजून 12 गाड्या येणार, कबूतरखान्याजवळ गाडीच्या टपावर पक्षांसाठी खाणं ठेवणाऱ्यांची मुजोरी

दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्यासह अनेक कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहेत. जैन समाजाने आक्रमक आंदोलन केले. तरीही, काही लोक कबूतरांना अन्न देत आहेत, एका व्यक्तीने गाडीतून अन्न दिलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. न्यायालयाचा निर्णय असूनही, वाद कायम आहे. कबुतरखान्याचे भविष्य अनिश्चित आहे.

Kabutar Khana Controversy : आमच्या अजून 12 गाड्या येणार, कबूतरखान्याजवळ गाडीच्या टपावर पक्षांसाठी खाणं ठेवणाऱ्यांची मुजोरी
कबूतरांसाठी गाडीच्या टपावर खाणं ठेवणाऱ्यांची मुजोरीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2025 | 10:56 AM
Share

Kabutar Khana Controversy : राज्यात सध्या कबूरखान्यांवरील बंदीवरून वातावरण पेटलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी कबूतरखाने बंद केले असून त्यामध्ये दादरच्या प्रसिद्ध कबूतर खान्याचाही समावेश आहे. मात्र त्यानंतर गेल्या आठवड्यात जैन समाजाने आक्रमक आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलक आत कबूतर खान्यामध्ये घुसले व त्यांनी ताडपत्री सोडवून कबूतर खाना सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही न्यायालयाने कबुतराखाना बंद ठेवण्याचा आपला आधीचा निर्णय कायम ठेवला आहे.

मात्र असं असूनही काही लोकांनी कबुतरांना खाणं देण कायम ठेवलं असून दादरर कबूतरखान्याजवळ एका इसमाने त्याच्या गाडीच्या टपावर कबूतरांसाठी खाद्य ठेवल्याचा प्रकार उघड झाला. मूळचा लालबागचा रहिवासी असलेला हा नागरिक कबूतरांना खाद्या देण्यासाठी दादरला आला असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्या इसमाला एका माणसाने जाब विचारला, कबूतरांना खाणं देऊ नका असंही सांगितलं, मात्र तरीही त्या माणसाचा हेका कायम होता. त्याने स्थानिक नागरिकासोबत हु्ज्जतही घातली, एवढंच नव्हे तर अजून 12 गाड्या (कबूतरांना खाद्य देण्यासाठी) येत आहेत, असं म्हणत त्या इसमाने मुजोरी दाखवली अशी माहितीही समोर आली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. भगव्या रंगाचा कुर्ता घातलेला हा इसम आणि त्याची गाडी व्हिडीओत दिसत्ये. लालबागमध्ये राहणारा हा माणूस सकाळच्या वेळेस कबुतरखान्याजवळ गाडी घेऊन आला आणि त्याने गाडीच्या टपावर एक ट्रे ठेवून त्यात कबूतरांसाठी खाद्य ठेवलं. ते पाहून स्थानिकांनी त्याला रोखलं, तेव्हा त्याने त्या लोकांशी हुज्जत घातली. एवढंच नव्हे तर आमच्या अजून 12 गाड्या येत आहेत, असंही त्याने सुनावलं. त्यामुळे कबूतरांना खाणं देण्याचा हा वाद आणखीनच भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

काय आहे प्रकरण ?

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील सर्व कबुतराखाने सध्या बंद करण्यात आले आहेत. मात्र पालिकेच्या या कारवाईविरोधात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. हे कबुतरखाने चालू करावेत या मागणीसाठी 4 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता, त्याला . कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, हे वरवरचे कारण असून मुंबईतल्या जागा आणि चौक हडपण्यासाठी हा कट रचला जातोय, असा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्यानंतर कबुतरखाने चालू करण्याची मागणी घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा पुन्हा ठोठावण्यात आला होता. मात्र न्यायालयाने कबुतरखान्यांवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला .

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.