AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; शिवाजी पार्कातील आंदोलनप्रकरणी पोलिसांत 3 गुन्हे, कारण काय?

mumbai political news : ठाकरे गटाने काल शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या प्रकरणी सभा आयोजकांवर पोलिसांकडून 3 गुन्हे दाखल करण्यात आले.

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; शिवाजी पार्कातील आंदोलनप्रकरणी पोलिसांत 3 गुन्हे, कारण काय?
| Updated on: Jul 20, 2026 | 11:43 AM
Share

मुंबईच्या दादरमधून मोठी बातमी आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काल शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या आंदोलनावेळी शिवसैनिक, आयोजक आणि पोलिसांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली होती. सभा झाल्यानंतरही आंदोलकांनी शिवाजी पार्क मैदान रिकामे केलं नव्हतं. सभेनंतरही आंदोलक, विद्यार्थी शिवाजी पार्क मैदान सोडायले तयार नव्हते. ही सभा विनापरवानगी घेतल्याचंही समोर आलं आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचे समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या कालच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना परवानगी आंदोलनाचे आयोजन केल्या प्रकरणी ठाकरे गटाच्या आयोजकांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आंदोलनास परवानगी नसतानाही लोकांना आंदोलन ठिकाणी जमण्यास आवाहन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आंदोलनानंतरही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दादर परिसरात ठिकठिकाणी आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ही मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलिसांनी तिसरा गुन्हा दाखल केलाय. या तीनही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आंदोलकांच्या गर्दीमुळे पोलिसांची धावपळ

ठाकरे गटाने शिवाजी पार्कावर आयोजित केलेल्या सभेला आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. शिवाजी पार्कातील गर्दीमुळे पोलिसांनी आंदोलकांना मैदान खाली करण्याचं आवाहन करण्यात येतं होतं. परंतु आंदोलक शिवाजी पार्क मैदान सोडायला तयार नव्हते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं.

उद्धव ठाकरेंचा सरकावर जोरदार हल्लाबोल

शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुमची पाकिस्तानशी चर्चा करण्याची चर्चा आहे. तर सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा का करू शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार  टीका केली होती.

Follow Us
भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील...
Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई; आयोजकांवर थेट 3 गुन्हे दाखल!
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
नागपूरच्या प्रसिद्ध अशोका रेस्टॉरंटच्या सूपमध्ये मेलेलं झुरळ
धक्कादायक! नागपूरच्या प्रसिद्ध अशोका रेस्टॉरंटच्या सूपमध्ये मेलेलं झुरळ; FDA कडून थेट परवाना निलंबित!
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद;
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद; काय म्हणाले?
अखेर प्रकरण पेटलंच! जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; परिस्थिती नियंत्रणात...
अखेर प्रकरण पेटलंच! जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज अन्...
सोनम वांगचुक यांना सरकार घाबरलं; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
Sanjay Raut Uncut | सोनम वांगचुक यांना सरकार घाबरलं; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
संसदेतील पावसाळी अधिवेशनाआधीच शिंदे गटाची महत्त्वाची बैठकी; श्रीकांत..
संसदेतील पावसाळी अधिवेशनाआधीच शिंदे गटाची महत्त्वाची बैठकी; श्रीकांत शिंदेंसह खासदारही उपस्थित
मोठी घडामोड! सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार; पण सरकारसमोर...
मोठी घडामोड! सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार; पण सरकारसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
Jantar Mantar Protest: लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या, आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले.

Jantar Mantar Protest: लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या, आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम.

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम

ममता बॅनर्जी यांना कोर्टाकडून मोठा दणका, दिलासा नाहीच, तब्बल 440 करोड...

ममता बॅनर्जी यांना कोर्टाकडून मोठा दणका, दिलासा नाहीच, तब्बल 440 करोड..

Parliament Monsoon Session 2026 : एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, प्रत्येक भारतीयाला अभिमान, नरेंद्र मोदींचे मोठे विधान...

Parliament Monsoon Session 2026 : एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, प्रत्येक भारतीयाला अभिमान, नरेंद्र मोदींचे मोठे विधान..

Fifa World Cup 2026 Final मधील पराभवानंतर अर्जेंटिनामध्ये दंगली, हजारो लोकांची पोलिसांवर दगडफेक.

Fifa World Cup 2026 Final मधील पराभवानंतर अर्जेंटिनामध्ये दंगली, हजारो लोकांची पोलिसांवर दगडफेक

माझ्यामुळेच TRP वाढतोय असा माज..; ‘रात्रीस खेळ चाले’च्या ‘शेवंता’ने अपूर्वा नेमळेकरला सुनावलं.

माझ्यामुळेच TRP वाढतोय असा माज..; ‘रात्रीस खेळ चाले’च्या ‘शेवंता’ने अपूर्वा नेमळेकरला सुनावलं