AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका, मुंबई पोलिसांच्या कामाला सॅल्यूट; हवामान विभागाचा पावसाबाबतचा मोठा इशारा काय?

मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. पुढील काही तास रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने काही भागांमध्ये रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे. सर्वदूर पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे.

बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका, मुंबई पोलिसांच्या कामाला सॅल्यूट; हवामान विभागाचा पावसाबाबतचा मोठा इशारा काय?
mumbai rain
| Updated on: Aug 18, 2025 | 2:43 PM
Share

मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलाय. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा दाट शक्यता आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. झोन 4 पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या शाळकरी मुलांना वाचवले आहे. ज्याची फोटो आणि व्हिडीओ पुढे आल्यानंतर पोलिसांवर काैतुकांचा जोरदार वर्षाव होताना दिसतोय. मुलांना बसमधून काढून कंबरेवर घेऊन गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना मुंबई पोलिस दिसत आहेत. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व शाळांना अर्धा दिवसाची सुट्टी देण्यात आली.

माटुंगा पोलिस ठाण्याजवळ डॉन बॉस्को स्कूलची बस पाण्यात अडकली. बसमध्ये सहा लहान मुले, दोन महिला कर्मचारी आणि चालक जवळजवळ एक तास अडकले होते. जागरूक नागरिकांनी डीसीपी झोन 4 ला परिस्थितीची माहिती दिली. तात्काळ कारवाई करून माटुंगाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पवार आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोन मिनिटांत सर्वांना वाचवले आणि त्यांना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी मुलांची भिती काढण्यासाठी त्यांना बिस्किटे देखील दिली.

डीसीपी रागसुधा आर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार आणि माटुंगा पोलिस कर्मचाऱ्यांचे आता काैतुक होताना दिसतंय. कारण व्हिडीओमध्ये पोलिस हे मुलांना सांभाळून पाण्यातून कडेवर घेऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहेत. दुसरीकडे अंधेरीमध्ये अडकलेली मर्सिडीज कार टोइंग व्हॅनच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. मर्सिडीज कार पाण्यातून बाहेर काढण्यासाठी टोइंग व्हॅन बोलावण्यात आली होती. पावसाचा धोका असून टळलेला नाहीये.

आज आणि उद्या कोकण, गोवा आणि मध्यमहाराष्ट्रातील घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईला आज आणि उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्याला आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय. पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील जोरदार पावसाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळत आहे. पुण्याच्या घाटमात्याला आज आणि उद्या रेड अलर्ट तर पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा