AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर संजय राऊतांचा घणाघात; म्हणाले, हे तर ताटाखालचं मांजर!

Sanjay Raut on Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होतेय. या सुनावणीआधीच संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर घणाघात केला आहे. त्यांनी ताटाखालचं मांजर म्हणत नार्वेकरांवर टीका केलीय. संजय राऊत नेमकं काय म्हणालेत? वाचा सविस्तर...

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर संजय राऊतांचा घणाघात; म्हणाले, हे तर ताटाखालचं मांजर!
| Updated on: Nov 28, 2023 | 11:35 AM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीआधी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणत होते की, सरकार पडणार नाही. मला त्यांना विचारायचंय, सरकार पाडणं हे तुमचं काम आहे का? आकडा पाहिजे. मग हा आकडा तुम्ही लावू नका. जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर बनून त्या खुर्चीवर बसलेली आहे. तोपर्यंत सरकार कसं पडेल?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

राऊतांचा नार्वेकरांवर घणाघात

राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे. गैरकानूनी पद्धतीने हे सरकार चालत आहे. कोर्टाने जे निर्देश दिले आहेत. नार्वेकर यांना कोर्टाने निर्देश दिले आहेत. सांगितले आहे की, राजकीय भाषा कमी करा. तुम्ही ज्या खुर्चीवरती बसले आहेत. कायद्यानुसार सरकार बाबत तुम्ही वकालत करू शकत नाही, असं कोर्टाने नार्वेकरांना सुनावलं आहे. स्वार्थासाठी त्यांनी अनेक पक्ष बदलेत. त्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा? बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदावर ही त्याच विचाराची व्यक्ती बसलेली आहे. बेकायदेशीर सरकारला संरक्षण देत आहे, असं म्हणत संजय राऊतांनी घणाघात केला आहे.

“तेलंगणामध्ये भाजप हारणार”

तेलंगणामध्ये भाजप जिंकणार नाही. तेलंगणामध्ये लढाई काँग्रेस आणि केसियार मध्ये सुरू आहे बीजेपीच्या स्पर्धेत देखील नाही. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान मात्र हे तेलंगामध्ये प्रचारामध्ये मग्न झाले आहेत. शेतकरी आक्रमक झालेले आहेत. पिकांचं नुकसान झालेलं आहे. तेलंगणामध्ये तुम्हाला कोण विचारतं? तुम्ही या ठिकाणी थांबा तेलंगणामध्ये तुमच्याशिवाय निवडणुका होणार नाही का? तुम्ही गेला किंवा नाही. तरी भारतीय जनता पक्ष तिथे हारणारच आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

“लोकसभा निवडणूक जिंकणारच”

एक हिंदुरुदय सम्राट दुसरे उप हिंदुरुदय सम्राट त्या ठिकाणी चाललेलं आहे. अजित पवार यांच्या पक्षात एवढे मोठे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी त्याच्यावरती बोललं पाहिजे. नवले की नाही त्यांनी 2024 साली पासून जनता त्यांना सत्तेपासून लांब ठेवणार आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाही सावधान आणि आरामात आम्ही या लोकसभेत लढणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.