मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या; संभाजीराजे राजधानी दिल्लीत, नेमकं काय घडतंय?

Sambhajiraje Chhatrapati in Navi Delhi : मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती सध्या राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. ते काही महत्वाच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यांच्यासोबत मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळदेखील आहे. राजधानी दिल्लीत नेमकं काय घडतंय? वाचा...

मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या; संभाजीराजे राजधानी दिल्लीत, नेमकं काय घडतंय?
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 10:18 AM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लढा आता अधिक तीव्र होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशातच आता राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलाय. संभाजीराजे छत्रपती राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह संभाजीराजे केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. दहा दिवसांआधी संभाजीरीजेंनी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. आता ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.

संभाजीराजे दिल्लीत

मराठा समाजाला न्याय मिळावा. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळावं, यासाठी संभाजीराजे ही भेट घेणार असल्याचं संभाजीराजे म्हणालेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी संभाजीराजे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. आज ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता दिल्लीत केंद्रिय मागासवर्ग आयोगात अयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांच्यासोबत भेट होणार आहे. या भेटीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेन.

याआधी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट

18 नोव्हेंबरला पुण्यात संभाजीराजे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे ज्वलंत प्रश्न मांडले. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळविण्यासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबरच कायदेशीर लढाई सुध्दा लढली पाहिजे, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले. संभाजीराजे यांच्यासोबत मराठा आरक्षणासाठी लढणारं शिष्टमंडळही होतं. स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, विनोद साबळे, आप्पासाहेब कुढेकर, रघूनाथ चित्रे, प्रशांत पाटणे, राहूल शिंदे, महादेव तळेकर, संजय पवार, गणेश सोनवणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी लढा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. मनोज जरांगे पाटील यासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौरा करत आहेत. अशातच राज्यातही ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं जात आहे. कायदेशीर रित्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात संभाजीराजे यांची महत्वाची भूमिका आहे.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...