Mumbai: ओमिक्रॉनवर जालिम उपाय, चाळिशीच्या पुढच्यांना बुस्टर डोसची तयारी

त्यातही ज्यांनी दोन्ही लस घेतल्यात त्यांच्यावर ओमिक्रॉनचे ना गंभीर परिणाम आहेत ना लागण होण्याचं प्रमाण अति जास्त आहे. आफ्रिका-यूरोपमध्ये हे दिसून आलंय. त्यामुळेच लसीकरण, बुस्टर डोस हीच प्रशासनाची प्राथमिकता असायला हवी असं तज्ञांचं म्हणनं आहे.

Mumbai: ओमिक्रॉनवर जालिम उपाय, चाळिशीच्या पुढच्यांना बुस्टर डोसची तयारी
40 वर्षाच्या पुढच्यांना बुस्टर डोस देण्याची शिफारस

महाराष्ट्रात ओमिक्रॉननं (Maharashtra Omicron News) भीती निर्माण केलेली असतानाच आता बुस्टर डोस देण्यात यावा अशी शिफारस जिनोम तज्ञांनी केंद्र सरकारल केली आहे. कर्नाटकमध्ये दोन ओमिक्रॉनचे (Karnataka Omicron Cases) रुग्ण सापडलेत. त्यातला एक आफ्रिकेला पळून गेला आहे. त्यामुळे सध्या तरी देशात एकच ओमिक्रॉनचा रुग्ण आहे. पण ह्या रुग्णाला कुठेही परदेशात न जाता ओमिक्रॉनची लागण झालीय. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडची शंका व्यक्त केली जातेय. त्यामुळेच आगामी काळात ओमिक्रॉनला रोखायचं तर ज्यांनी दोन डोस घेतलेत त्यांना बुस्टर डोस (Booster Dose) द्यावा असं इंडियन सार्स कोविड-2 जेनेटीक कन्सोर्टीयमने साप्ताहिक बुलेटीनमध्ये शिफारस केलीय. इन्साकॉग ही जिनोम व्हेरीएशन्सवर वॉच ठेवण्यासाठी केंद्रानं उभारलेल्या राष्ट्रीय प्रयोगशाळांची प्रमुख संस्था आहे.

कुणाला बुस्टर डोस?
बुस्टर डोस कुणाला द्यावा, तो प्राधान्याने कुणाला द्यावा यावर काहीसे मतभेद आहेत. असे मतभेद पहिल्यांदा लस आली त्यावेळेसही झाले होते. पण 40 वर्षांपेक्षा ज्याचं वय जास्त आहे, त्यांना बुस्टर डोस द्यावा अशी मागणी लोकसभेत खासदारांनी केली होती. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सनाही प्रायोरिटीनं बुस्टर डोस द्यायला हवा असे जाणकार सांगतायत कारण ते कोरोनाच्या विळख्यात महत्वाची भूमिका पार पाडतायत. ज्यांना लस घेऊन सात ते आठ महिने उलटलेत त्यांनाही बुस्टर डोस दिला जावा असं तज्ञांचं म्हणनं आहे. ह्या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात बुस्टर डोस दिला जाऊ शकतो. पुण्याच्या सिरिम इन्सिटीट्युटनं त्याची तयारीही केलीय.

कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड रोखणार
ओमिक्रॉनला रोखणार कसं यावर सखोल चर्चा घडतायत. त्यात भारतात वापरत असलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड ह्या दोन्ही लसी किती प्रभावशाली ठरतील याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय. पण त्यावरचा संशय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दूर केलाय. भारतीय जनतेनं डेल्टाशी सामना केलेला आहे. त्याविरोधात दोन्ही लस ह्या प्रभावी ठरलेल्या आहेत. त्यामुळेच आगामी काळातही ह्या दोन्ही लसच ओमिक्रॉनचा विषाणू रोखण्यात महत्वाची भूमिका बजावतील असं मंत्रालयानं म्हटलेलं आहे. ओमिक्रॉन हा विषाणू वेगानं पसरतो, त्याची लागण होते पण त्याचे परिणाम गंभीर नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातही ज्यांनी दोन्ही लस घेतल्यात त्यांच्यावर ओमिक्रॉनचे ना गंभीर परिणाम आहेत ना लागण होण्याचं प्रमाण अति जास्त आहे. आफ्रिका-यूरोपमध्ये हे दिसून आलंय. त्यामुळेच लसीकरण, बुस्टर डोस हीच प्रशासनाची प्राथमिकता असायला हवी असं तज्ञांचं म्हणनं आहे.

हे सुद्धा वाचा:

बॉलिवूडची चर्चित नावं, तरी मृत्यूने गाठलं अन् कुणाला कळलंच नाही! ब्रह्माच नाही तर ‘या’ कलाकारांचा शेवटही वेदनादायी!

Ulhasnagar | पंचम कलानींसह 9 नगरसेविकांना क्रॉस वोटिंग प्रकरणात दिलासा, भाजपला धक्का

अवकाळी पावसात 2 हजार जनावरे दगावली, राज्य सरकारकडून पशूपालकांना मिळणार आर्थिक मदत

Published On - 8:52 am, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI