AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रिय बाबा… संघर्षाच्या काळात अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल, याचा विश्वास; शरद पवारांच्या वाढदिनी सुप्रिया सुळेंची स्पेशल पोस्ट

Supriya Sule Post About Sharad Pawar Birthday : तुम्ही आम्हा सर्वांसाठी सदैव अखंड उर्जादायी आहात,आमच्यासाठी स्पेशल आहात बाबा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा; शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांची खास पोस्ट... खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा. वाचा सविस्तर...

प्रिय बाबा... संघर्षाच्या काळात अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल, याचा विश्वास; शरद पवारांच्या वाढदिनी सुप्रिया सुळेंची स्पेशल पोस्ट
| Updated on: Dec 12, 2023 | 2:32 PM
Share

मुंबई | 12 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा संघर्षाचा काळ आहे. या संघर्षाच्या काळात आपण लढाल आणि जिंकाल याचा विश्वास असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आधी लढाई जनहिताची, म्हणत सुप्रिया सुळे यांनी ही पोस्ट शेअर केलीय. शरद पवार यांना व्हीडिओ कॉल करत सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचा स्क्रिनशॉट सुप्रिया सुळे यांनी शेअर केलाय. तसंच शरद पवारांचे कुटंबासोबचे फोटोही सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेत.

सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

आधी लढाई जनहिताची !!!

प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.

मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.

कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.

मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.

संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.

लढेंगे-जितेंगे !!

बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही सर्वांसाठी सदैव अखंड उर्जादायी आहात, असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांची पोस्ट

प्रिय बाबा,

तुम्ही आम्हा सर्वांसाठी सदैव अखंड उर्जादायी आहात. तुम्ही आमच्यासाठी स्पेशल आहात. कुटुंब असो की समाजकारण तुम्ही सर्वत्र आमचे मार्गदर्शक आणि आदर्श आहात. तुम्ही आम्हाला स्वाभिमानी विचारांचा आणि त्यासाठी लढण्याचा वारसा दिला आहे. तुमच्या विचारांची मशाल कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण अखंड प्रयत्न करीत आहोत. तुमचा मायेचा हात असाच कायम डोक्यावर राहो.

तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो हि सदिच्छा.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.