मुंबईत थर्टी फर्स्टसाठी विशेष 12 लोकल

मुंबईत थर्टी फर्स्टसाठी विशेष 12 लोकल
लोकल ट्रेन

मुंबई : थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत करुन घरी परतणाऱ्या मुंबईकरांना पश्चिम रेल्वेने खूशखबर दिली आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल गाड्या सोडण्यात येणार आहेत. थर्टी फर्स्टला मुंबईकर चौपाट्या, गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन्सवर नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर जमतात. मात्र मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करुन मुंबईकरांना घरी परतता यावे यासाठी रेल्वेने विशेष खबरदारी […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत करुन घरी परतणाऱ्या मुंबईकरांना पश्चिम रेल्वेने खूशखबर दिली आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल गाड्या सोडण्यात येणार आहेत. थर्टी फर्स्टला मुंबईकर चौपाट्या, गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन्सवर नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर जमतात. मात्र मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करुन मुंबईकरांना घरी परतता यावे यासाठी रेल्वेने विशेष खबरदारी घेतली आहे. थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री रेल्वे प्रशासनाकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

चर्चगेट ते विरारदरम्यान चार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान चार विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तसेच मध्य रेल्वेवर दोन तर हार्बर मार्गावर दोन विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. या लोकल बारा डब्यांच्या असतील. याशिवाय सर्व स्थानकांवर त्यांना थांबा देण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

पश्चिम मार्गावर अशा धावतील विशेष लोकल :

– चर्चगेट येथून विरारसाठी रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी सुटेल, ती विरार स्थानकात  रात्री 2 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल.

-दुसरी लोकल चर्चगेट येथून विरारसाठी रात्री 2 वाजता सुटेल, ती विरार स्थानकात रात्री 3 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.

– तिसरी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी सुटेल, ती विरार स्थानकात पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल.

– चौथी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री 3 वाजून 25 मिनिटांनी सुटेल, ती विरार स्थानकात पहाटे 5 वाजून 05 मिनिटांनी पोहोचेल.

अप मार्गावरील विशेष लोकल

– पहिली लोकल विरार स्थानकातून रात्री 12  वाजून 15 मिनिटांची असून ती चर्चगेट स्थानकात रात्री 1 वाजून 47 मिनिटांनी पोहोचेल.

– दुसरी लोकल विरार स्थानकातून रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी सुटेल, ती चर्चगेट स्थानकात रात्री 2 वाजून 17 मिनिटांनी पोहोचेल.

– तिसरी लोकल विरार स्थानकातून रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सुटेल, ती चर्चगेट स्थानकात रात्री 3 वाजून 12 मिनिटांनी पोहोचेल.

– चौथी लोकल विरार स्थानकातून रात्री 3 वाजून 05 मिनिटांनी सुटेल, ती चर्चगेट स्थानकात पहाटे 4 वाजून 37 मिनिटांनी पोहोचेल.

 मध्य मार्गावर अशा धावतील विशेष लोकल :  

– पहिली विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी सुटणार आणि कल्याण स्थानकात ती रात्री 3 वाजता पोहोचेल.

– दुसरी लोकल कल्याण स्थानकातून रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी सुटेल, ती सीएसएमटी येथे रात्री 3 वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर अशा धावतील विशेष लोकल :  

– पहिली विशेष लोकल सीएसएमटीहून 1 वाजून 30 मिनिटांनी सुटेल, ती पनवेलला 2.30 वाजता पोहोचेल.

– दुसरी लोकल पनवेल स्थानकातून रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी सुटेल, ती सीएसएमटी येथे 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें