AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडाळा पोलीस कोठडीत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाच पोलीस निलंबित

वडाळा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या कस्टडीत एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू (youth death in wadala police custody) झाला.

वडाळा पोलीस कोठडीत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाच पोलीस निलंबित
| Edited By: | Updated on: Oct 30, 2019 | 10:17 AM
Share

मुंबई : वडाळा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या कोठडीत एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू (youth death in wadala police custody) झाला. पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी पाच पोलिसांना निलंबित केले आहे. तसेच मृत विजय विजय सिंहची (youth death in wadala police custody) तक्रार करणाऱ्या प्रेमी युगुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप विजयच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.

मृत विजय सिंह एका फार्मा कंपनीत काम करत होता. सोमवारी (28 ऑक्टोबर) रात्री एका प्रेमी युगुलासोबत वाद झाल्याने विजयला वडाळा पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर विजयच्या छातीत दुखू लागले. परंतु, पोलिसांनी केवळ नाटक करत असल्याचे म्हणत दुर्लक्ष केले आणि विजयला मारहाण केली, असा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे.

या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही हे प्रकरण व्यवस्थित हाताळून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

विजयला पोलिसांनी पकडल्यानंतर विजयची आई पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. पण त्यांनाही भेटू दिले नाही. रात्री 2 वाजता विजय जमिनीवर कोसळला असता त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

विजयच्या मृत्यूनंतर विभागात अनेकांनी मोर्चे काढले. तसेच पोलिसांवर कारवाई करत त्यांना निलंबित करा. विजयचा मृत्यू संशयास्पद आहे, अशी मागणी जमावाकडून करण्यात येत होती. यावेळी मोठ्या संख्येने लोक जमल्याने पोलिसांकडूनही जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.

नेमकं प्रकरण काय ?

विजय सिंह फार्मा कंपनीत कामाला होता. 28 ऑक्टोबरला रात्री विजय ट्रक टर्मिनल येथील एमएमआरडीए कम्पाऊंड परिसरात गेला होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीचा प्रकाश तेथे बसलेल्या प्रेमी युगुलावर पडला. त्यावरुन प्रेमी युगुल आणि विजयमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तसेच प्रेमी युगुलाने विजयला मारहाण केली. त्यानंतर विजयने आपल्या चुलत भावांना फोन करुन बोलावून घेतले. विजयचे भाऊ येताच तेथे जोरदार हाणामारी झाली. या दरम्यान गस्तीवरील पोलिसांची गाडी घटनास्थळी आली. पोलिसांसमोर तरुणीने विजय आणि त्याच्या भावावर छेडछाड करत असल्याचे आरोप लावले. त्यामुळे पोलिसांनी विजयसह त्याच्या भावांना पोलीस स्टेशनमध्ये नेले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पोलिसांनी चौकशी न करता विजयला मारहाण केली. यावेळी त्याच्या छातीत मुका मार लागला. मुका मार लागल्याने विजयच्या छातीत दुखू लागले. त्यावेळी त्याने पाणी देण्याचीही विनवणी केली. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण काहीवेळाने विजय बेशुद्ध पडला. त्यानंतर मात्र पोलिसांनी विजयला कुटुंबियांच्या ताब्यात दिले आणि रुग्णालयात नेण्याची सूचना केली. रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्यामुळे विजयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

प्रेमी युगुलावरही गुन्हा दाखल 

वडाळा कोठडीतील मृत्यू प्रकरणात विजयची तक्रार करणाऱ्या प्रेमी युगुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ देवेंद्र आणि आफरीन, असं या प्रेमी युगुलाचे नाव आहे. तसेच हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.