AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्री ड्रोन प्रकरणी आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, 5 प्रश्नांनी संशय वाढला!

वांद्रे येथील ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीच्या परिसरातील ड्रोनच्या घिरट्या घालणारा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सर्वत्र खळबळ माजली. आता यावर आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. तसेच त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मातोश्री ड्रोन प्रकरणी आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, 5 प्रश्नांनी संशय वाढला!
Aditya thackerayImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 09, 2025 | 2:36 PM
Share

वांद्रे येथील ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीच्या परिसरात एक ड्रोन अचानक घिरट्या घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब, सचिन अहिर आणि इतर काही नेत्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र, आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. “आज सकाळी आमच्या निवासस्थानात डोकावणारा एक ड्रोन पकडला गेला आणि जेव्हा माध्यमांना याची माहिती मिळाली, तेव्हा @MMRDAOfficialने स्पष्टीकरण देत. हा बीकेसीसाठी केला जाणारा सर्वे आहे. हा सर्वे मुंबई पोलिसांची परवानगी घेऊन करण्यात आला. ठीक आहे” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले प्रश्न

आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. कोणते सर्वे घरांमध्ये डोकावण्याची आणि पकडले गेल्यावर ताबडतोब पळून जाण्याची परवानगी देते? रहिवाशांना याची पूर्वसूचना का दिली नाही? संपूर्ण बीकेसीसाठी MMRDA फक्त आमच्या घराचा सर्वे करत आहेत का? MMRDA ने त्याऐवजी जमिनीवर उतरून त्यांच्या भ्रष्टाचाराचे एक उदाहरण असलेल्या एमटीएचएल (अटल सेतू) सारख्या बनावट कामावर लक्ष केंद्रित करावे. तसेच जर पोलिसांनी परवानगी दिली असेल, तर रहिवाशांना याची माहिती का दिली नाही? असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

ठाकरे घराण्याचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात अचानक ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती समोर आली आहे. हे ड्रोन कोणी उडवले आहेत? त्यामागचा हेतू नेमका काय आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. मातोश्री परिसरात ड्रोनच्या अचानक घिरट्या घालतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.