Navneet Rana | राणा दाम्पत्याची कोर्टात गैरहजेरी, वकिलांनी वेळ मागवून घेतला; आता सुनावणी 15 जूनला

राणा दाम्पत्याच्या वकिलांनी सुनावणीसाठी आता वेळ वाढवून मागितली आहे. राणा दाम्पत्यावरील सुनावणी 15 जूनला होणार आहे. राणा दाम्पत्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते. राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. पण, राणा दाम्पत्याच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली आहे.

Navneet Rana | राणा दाम्पत्याची कोर्टात गैरहजेरी, वकिलांनी वेळ मागवून घेतला; आता सुनावणी 15 जूनला
राणा दाम्पत्याची कोर्टात गैरहजेरी, वकिलांनी वेळ मागवून घेतली
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 18, 2022 | 12:52 PM

मुंबई : सरकारी वकील घरत म्हणाले, आज कोर्टामध्ये राणा दाम्पत्याला (Rana couple) मागच्या तारखेला नोटीस देऊन हजर राहायला सांगितलं होतं. पण खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज कोर्टात हजर झाले नाही. त्यांच्या वतीनं त्यांचे वकील कोर्टात हजर होते. घरत यांनी सांगितलं की, मी कोर्टात आल्यानंतर मला कळलं की आम्हाला नोटीसची कॉपीच (copy of notice) दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयानं 124 ए ही कलम स्थगित ठेवलंय. पण केसमध्ये इतर सेक्शनही असल्यामुळे आणि आरोपींनी अटी आणि शर्थीचा भंग केला. 124 या सेक्शनचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळं त्याच्यावर आम्ही युक्तिवाद (argument) करण्यासाठी न्यायालयासमोर प्रार्थना केली. नोटीस लागली नसली तरी आरोपींचे वकील न्यायालयासमोर हजर होते. त्यामुळं युक्तिवाद ऐकण्यास काही हरकत नाही, असं आम्ही न्यायालयाला सांगितलं. न्यायालयानं त्यांची हजेरी नोंद करून घेऊन युक्तिवादासाठी नवी तारीख दिली आहे.

वकिलांनी वेळ वाढवून मागितला

राणा दाम्पत्याच्या वकिलांनी सुनावणीसाठी आता वेळ वाढवून मागितली आहे. राणा दाम्पत्यावरील सुनावणी 15 जूनला होणार आहे. राणा दाम्पत्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते. राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. पण, राणा दाम्पत्याच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली आहे. सरकारी वकील घरत म्हणाले, त्यांनी काही कागद आणले आहेत. मीडिया आणि पोलिसांना द्यायचे नाही, असं सांगितलंय. आता ते कॉन्फिडेन्शिअल आहे. त्यामुळे मी पण ते बघू की नको असं वाटतंय. आता लांबची तारीख दिली आहे. इथून पुढं मुलाखत देण्यास मज्जाव करण्यास यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. 15 जूनची तारीख कोर्टानं दिली आहे. कायद्यानं त्यांनी आज यायला हवं होतं. पण ते काही आले नाही. पुढच्या तारखेला त्यांनी यायला हवं, असं दिसतंय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अटी, शर्थींचा भंग?

काही अटी आणि शर्थींवर राणा दाम्पत्याची जामिनावर सुटका झाली होती. पण, त्यांनी अटींचा भंग केला. माध्यमांशी ते बोलत आहेत. शिवाय आज कोर्टात हजर होणं आवश्यक होते. पण, राणा दाम्पत्य कोर्टात हजर झाले नाही. त्यामुळं राणा दाम्पत्याच्या वकिलांनी कोर्टाला वेळ वाढवून मागितली. आता राणा दाम्पत्याची सुनावणी 15 जूनला होणार असल्याचं सरकार वकिलांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें