AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Tiger | अमरावतीचे मेळघाट वनपरिक्षेत्र, साडेचारशेवर अधिक पाणवठे; विविध प्राण्यांची गणना, वाघ, बिबट्यांचे दर्शन

बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी अंबाबरवा जंगलात 6 वाघ, 6 बिबट्यांनी दर्शन दिल्याची नोंद करण्यात आली आहे. प्राणीप्रेमी आणि वन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चंद्राच्या प्रकाशात अभयारण्यातील वाघांशिवाय 801 वन्यप्राण्यांची नोंद केली आहे.

Amravati Tiger | अमरावतीचे मेळघाट वनपरिक्षेत्र, साडेचारशेवर अधिक पाणवठे; विविध प्राण्यांची गणना, वाघ, बिबट्यांचे दर्शन
अमरावतीचे मेळघाट वनपरिक्षेत्र, साडेचारशेवर अधिक पाणवठेImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 10:59 AM
Share

अमरावती : मेळघाट क्षेत्रामध्ये साडेचारशेहून अधिक पाणवठ्यांवर एक हजारच्या जवळपास प्राणीमित्रांनी प्राण्यांची गणना केली. बुद्ध जयंतीचे औचित्य साधून प्राणी गणनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या (Buddha Pournima) दुपारी बारा वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी बारा वाजतापर्यंत 24 तासाची मचाणावर प्राणीमित्र बसले. ही गणना पर्यटकांसाठी लाभदायी ठरली. अनेक पर्यटकांना वाघ, अस्वल, बिबटे, सांबर, कोल्हा असे अनेक जंगली पशुपक्षी यांचे दर्शन झाल्याचं सुजाता गोंडचवर व गजानन तायडे यांनी सांगितलं. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे प्राणी गणनेत सर्वसामान्य पर्यटकांना सहभागी होणे शक्य झाले नाही. त्यामुळं यावर्षी झालेली गणना व त्यामध्ये सहभागी झालेले पर्यटक मोठे उत्साहित होते. मोठ्या संख्येने पर्यटकांनी या सोहळ्यात भाग घेतला. मेळघाटाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रामध्ये (Chikhaldara Forest Reserve) वाघ, बिबट, अस्वल वन्यप्राण्यांचे दर्शन घडल्याचं चिखलदऱ्याचे आरएफओ मयूर भैलू (RFO Mayur Bhailume) मे यांनी सांगितलं.

अंबाबारवा अभयारण्यात 6 वाघ तर 6 बिबटे

बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी अंबाबरवा जंगलात 6 वाघ, 6 बिबट्यांनी दर्शन दिल्याची नोंद करण्यात आली आहे. प्राणीप्रेमी आणि वन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चंद्राच्या प्रकाशात अभयारण्यातील वाघांशिवाय 801 वन्यप्राण्यांची नोंद केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी अंबाबारवा अभयारण्यात 801 वन्य प्राण्यांनी दर्शन दिले. तर गत दोन वर्षाआधी 2020 मध्ये या अभयारण्यात एकूण 3 हजार 168 वन्य प्राणी वास्तव्यास होते.

25 पाणवठ्यावर 25 मचाण

यावर्षी करण्यात आलेल्या नोंदीनुसार, वाघ 6, बिबट 6, अस्वल 15, तडस 2, नील गाय 70, सांबर 49, भेडकी 28, गवा 48, रान डुक्कर 172, लंगूर 2, माकड 155, म्हसण्या उद 11, रान कोंबडी 54, रान मांजर 1, मोर 151, ससा 10, सायाळ 12, कोल्हा 2, लांडगा 7 असे एकूण 801 प्राण्यांनी दर्शन दिले. प्राणी गणनेसाठी अभयारण्यात 7 नैसर्गिक 18 कृत्रिम असे एकूण 25 पाणवठ्यावर 25 मचाण उभारण्यात आले होते, यादरम्यान 16 वनरक्षक, 35 वनमजूर, 4 वनपाल, 5 विशेष व्याघ्रदलाचे जवान कर्तव्यावर होते. यावर्षी अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये प्रवेश मिळाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.