Wardha water | उन्हाचा पारा 45 वर, विहिरींना गाठला तळ, तहान कशा भागविणार? वर्ध्याच्या मोहगावमध्ये भीषण पाणीटंचाई

पाण्याची पातळी खालावल्याने नागरिक त्रस्त झालेत. हक्काची पाणीपुरवठा योजना केव्हा मिळणार असाच प्रश्न तावीच्या सुमित्रा गोडघाटे व शांता फुलझेले यांनी केलाय. मोहगाव ग्रामपंचायतीमध्ये येत असलेले केसलापार, तावी, रासा या तीन गावांसाठी जलजीवन योजने अंतर्गत कामं मंजूर झाली. पण अजून कामाचा पत्ता नसल्याने आम्हाला हक्काची पाणीपुरवठा योजना केव्हा मिळणार हा प्रश्न येथील नागरिक करीत आहे.

Wardha water | उन्हाचा पारा 45 वर, विहिरींना गाठला तळ, तहान कशा भागविणार? वर्ध्याच्या मोहगावमध्ये भीषण पाणीटंचाई
वर्ध्याच्या मोहगावमध्ये भीषण पाणीटंचाई
Image Credit source: t v 9
चेतन व्यास

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 18, 2022 | 10:33 AM

वर्धा : उन्हात पारा पंचेचाळीस वर गेला. ग्रामीण भागात विहिरींचा घसा देखील कोरडा झाल्याचे चित्र आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव (Mohgaon in Samudrapur taluka) ग्रामपंचायतीच्या तीन गावांची तहान तेथील विहिरी भागवू शकत नाहीत. दररोज नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट मे महिन्यात वाढली आहे. दरवर्षी विहीर अधिग्रहणाच्या (well acquisition) माध्यमातून या गावाला पाणी दिले जाते. हीच वेळ यावर्षी देखील आलीय. पण यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. किमान पाण्यासाठीची पायपीट थांबवावी, अशीच मागणी गावकऱ्यांनी केली आहे. केसलापार, रासा, तावी ही गावे मोहगाव या गटग्राम पंचायतमध्ये येतात. लोकसंख्येचा विचार केला तर प्रत्येक गावाची लोकसंख्या चारशेच्या घरात आहे. गावातील हँडपम्प व विहिरी कोरड्या (well dry) पडल्या आहेत. कधी नव्हे इतकी भीषण पाणीटंचाई या वर्षी गावात पाहायला मिळते आहे.

कुपनलिका, विहिरी कोरड्या

पाण्याची पातळी खालावल्याने नागरिक त्रस्त झालेत. हक्काची पाणीपुरवठा योजना केव्हा मिळणार असाच प्रश्न तावीच्या सुमित्रा गोडघाटे व शांता फुलझेले यांनी केलाय. मोहगाव ग्रामपंचायतीमध्ये येत असलेले केसलापार, तावी, रासा या तीन गावांसाठी जलजीवन योजने अंतर्गत कामं मंजूर झाली. पण अजून कामाचा पत्ता नसल्याने आम्हाला हक्काची पाणीपुरवठा योजना केव्हा मिळणार हा प्रश्न येथील नागरिक करीत आहे. या तिन्ही गावातील महिलांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने गावात असलेल्या कुपनलिका व विहीर कोरड्या पडल्या आहेत. अशी माहिती मोहगावचे सरपंच विलास नवघरे यांनी दिली.

अधिकारी म्हणतात, नियोजन करण्यात आलंय

तावी, रासा, केसलापार या गावात सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र यातही लोडशेडींगमुळे पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. जलजीवन अंतर्गत योजने अंतर्गत तिन्ही गावातील कामं मंजूर झाली आहेत. 85 लाख रुपये प्रस्तवित करण्यात आले. पण शासकीय कागदपत्रांच्या हालचालींचा वेग पाहता ही कामे पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. नवीन विहीर आणि दरडोई दरमानसी 55 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असं पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें