गजानन कीर्तिकर यांच्यावर 2 दिवसांत कारवाई ? अडसूळ म्हणाले कारवाई झाली तर आम्ही…
शिंदे गटाने नेते गजानन किर्तिकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. गजानन किर्तीकर यांच्यावर पक्ष काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आनंदराव अडसूळ यांनी देखील कारवाई केल्यास इशारा दिला आहे.

गजानन कीर्तिकर यांच्यावर पुढच्या 2-3 दिवसांत कारवाईचा निर्णय होईल, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना मदत केल्याची शंका आता शिंदे गटानंही व्यक्त केलीये. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, गजाजन कीर्तिकरांवर कारवाई बाबत 2-3 दिवसांत निर्णय होईल. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना मदत करण्यावरुन गजानन कीर्तिकरांबद्दल संशय आहे असं शिंदे गटानं पहिल्यांदाच म्हटलंय.
अमोल कीर्तिकर ठाकरे गटात आहेत तर वडील गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत. गजानन कीर्तिकरांच्या पत्नी आणि अमोल कीर्तिकरांच्या आईनंही स्पष्ट सांगितलं की आपण अमोल कीर्तिकरांनाच मतदान केलं. तर अमोल हा निष्ठावंत आहे त्यामुळंच तो शिंदे गटात आला नाही, असं बेधडकपणे गजानन कीर्तिकर म्हणाले. त्यावरुनच, शिंदे गटानं समितीकडे प्रकरण गेलं असून कारवाईचे संकेत दिले आहेत.
गजानन कीर्तिकरांवरुन भाजपनंही निशाणा साधलाय. महायुतीचा धर्म गजानन कीर्तिकरांनी पाळला नाही, असं दरेकर म्हणाले आहेत. आता कारवाईबद्दल शिंदे गटानं पक्षांतर्गत ठरवावं हेही दरेकरांचं म्हणणं आहे.
इकडे शिंदे गटातलेच ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ कीतिकरांच्या बाजूनं आहेत. कारवाई झाली तर आम्हीही विचार करु, असा इशाराच अडूसळांनी शिंदे गटाला दिला आहे. भाजपचे नेते ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्यावरुन त्यांना गजानन कीर्तिकरांवर कारवाईची अपेक्षा आहे. आता 2-3 दिवसांत काय कारवाई होते दिसेलच.
गजानन किर्तीकर हे निवडणुकीच्या दिवशी अमोल किर्तीकरांच्या गाडीतून फिरत होते असा दावा भाजपनं केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने सुरु केली आहे.
गजानन किर्तीकर म्हणाले होते की, मी कोल्हापूर, नाशिकला प्रचाराला गेलो. आमच्या उमेदवारासाठी सर्व काही केलेय. एकनाथ शिंदे एक उद्दीष्ट घेऊन आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांना मी शेवटपर्यंत साथ देईन. काही गोष्टींचा विपर्यास केला गेला. याचा मला त्रास होतो. असा प्रसंग कुणाच्याही जीवनात येऊ नये.
