AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्हाला शेड्यूल 10 लागू होत नाही’, शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी ठाकरे गटाने मांडलेल्या एका युक्तिवादावर शिंदे गटाने आक्षेप घेतला. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी महत्त्वाची भूमिका मांडली.

'आम्हाला शेड्यूल 10 लागू होत नाही', शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
eknath shinde and uddhav thackeray
| Updated on: Sep 25, 2023 | 6:19 PM
Share

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणी एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याच याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. पण त्यांच्या या युक्तिवादावर शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी आक्षेप घेतला. अनिल साखरे यांनी मांडलेला युक्तिवादाची सविस्तर माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अनिल साखरे यांनी यावेळी शेड्यूल 10 च्या मुद्द्यावरुनही भूमिका मांडली.

“निवडणूक आयोगाचा निकाल हा आमच्याबाजूने आहे. आम्हीच खरा पक्ष आणि आयोगान पक्ष आणि चिन्ह आम्हाला दिले असताना आम्हाला अपात्र करण्याची नोटीस कशी काय देऊ शकता? आम्हाला शेड्यूल 10 (पक्षांतरबंदी कायदा) लागू होत नाही”, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी केला.

ठाकरे गटाकडून शिंदेंविरोधात अपात्रतेच्या याचिका जून आणि जुलैमध्येच दाखल केल्या होत्या. सुनील प्रभू यांनी 16 याचिका दाखल केल्या होत्या. त्यानंतर तीन आमदारांविरोधात एकत्रित निलंबनाची याचिका केली. त्यानंतर 40 आमदारांविरोधात एकत्रित निलंबनाची याचिका दाखल केली, असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.

नेमका युक्तिवाद काय?

बच्चू कडू यांचे वकील प्रविण टेंभेकर यांनी सांगितले की, “ठाकरे गटाने आताच निकाल देण्याची मागणी केली. मात्र साक्ष नोंदवणे, संबंधीत कागदपत्रे तपासणे, यासाठी वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.” यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी आपली भूमिका मांडली. प्रत्येक आमदारांची स्वतंत्र सुनावणी झाली पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली.

यावेळी विधानसभा अध्यक्षांनी 13 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होईल, असं जाहीर केलं. प्रत्येक आमदारांविरोधातील याचिका एकत्रित चालवायची की वेगवेगळी घ्यायचा याचा निर्णय 13 ऑक्टोबरला होईल, असं अध्यक्षांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या वकिलांचे म्हणणे होते की, इव्हिडन्स दाखल करण्याची काहीही गरज नाही. तर शिंदेंच्या वकिलांनी पुरावे दाखल करण्याची मागणी केली. दोन्ही गटांच्या युक्तीवादानंतर अध्यक्षांनी आजचा निर्णय राखून ठेवला.

ही घटना एकच आहे. घटनाक्रम एकच आहे. एकत्रित सुनावणी घेऊन आजच निर्णय द्या, असा युक्तीवाद ठाकरे गटाने केला. दुसरीकडे शिंदे गटाच्या वकीलांचे म्हणणे आहे की, प्रत्येकाची बाजू वेगवेगळी आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या परिस्थितीत शिंदेंसोबत गेला आहे. त्यामुळे सर्वांना एकाच धाग्यात ओवणे योग्य नाही. वेगवेगळी सुनावणी झाली पाहिजे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.