AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक, नेत्यांची तातडीची बैठक बोलावली; राष्ट्रवादीत काय घडतंय?

शरद पवार यांच्या भेटीनंतर पार्थ पवार सक्रिय झाले असून, राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका लावला आहे. या अनपेक्षित घडामोडींमुळे राष्ट्रवादीत नेमके काय शिजत आहे, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. पुणे निधी वाटपाचा वाद आणि पक्षांतर्गत रणनीतीवर या बैठकांत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक, नेत्यांची तातडीची बैठक बोलावली; राष्ट्रवादीत काय घडतंय?
parth pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2026 | 12:18 PM
Share

दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्य आणि केंद्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीनंतर पार्थ पवार अधिकच आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांना भेटल्यानंतर पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत बैठकांचा झपाटा लावला आहे. काल रात्री राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर पार्थ यांची आता पुन्हा एकदा नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार हे गुलदस्त्यात आहे. पार्थ पवार यांनी लागोपाठ दोन दिवस बैठक घेतल्याने राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय? अशी चर्चा रंगली आहे.

पार्थ पवार यांनी काल शुक्रवारी रात्री मोजक्या मंत्र्यासोबत बैठक केली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील राजकीय परिस्थिती, केंद्रातील मंत्रीपद आणि राज्यातील विकास कामे आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मंत्र्यांच्या खात्यात येणाऱ्या अडचणीवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पार्थ पवार यांच्या वरळी येथील निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक उपस्थित होते.

कारण गुलदस्त्यात

कालच्या बैठकीनंतर आज दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअर कमिटीची बैठक सुरू झाली आहे. पार्थ पवार यांच्या वरळी येथील शुभदा निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नवाब मलिक, मंत्री नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक उपस्थित आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत.

पवारांना भेटले अन्…

दोन दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. सिल्व्हर ओक येथे जाऊन सुमारे तीन तास त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली होती. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. त्यानंतर पार्थ पवार यांनी अचानक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीत काय घडतंय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यातील वाद

दरम्यान, पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीत तणातणी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी कापण्यात आल्याने दोन्ही पक्षातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक होत असून त्यात हा विषय निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवार यांच्यात सोमवारी बैठक होण्याची शक्यता आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाची पार्थ पवारांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली होती. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Follow Us
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल