AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी अपडेट… सरकारचा मोठा निर्णय, CID कडूनही चौकशी

Ajit Pawar Plane Crash Investigation: दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. आता या विमान अपघातावरून मतमतांतरं व्यक्त होत आहेत. काहींना हा घातपात वाटत आहे. या चर्चेदरम्यान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. CID चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी अपडेट... सरकारचा मोठा निर्णय, CID कडूनही चौकशी
अजित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 30, 2026 | 10:45 AM
Share

Ajit Pawar Plane Crash Investigation: बारामती विमानतळाजवळ भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचं निधन झाले. या निधनाने राज्याला मोठा धक्का बसला. या विमान अपघातावर मतमतांतरं व्यक्त झाली. काहींनी हा घातपात असल्याचा आरोप केला. काहींनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली. या विमान अपघाताप्रकरणी तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेच. केंद्रीय हवाई उड्डायण मंत्रालयाने तपास सुरू केला आहे. तर लोकांच्या मनातील संशय दूर व्हावा यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याप्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून(CID) चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अहवालातून काय बाबी समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विमान अपघात तपास ब्युरोकडून तपास सुरु

विमान अपघात तपास ब्युरोकडून (AAIB) कडून तपास सुरू झाला आहे. तीन सदस्यीय पथकाने ब्लॅकबॉक्स ताब्यात घेतला आहे. विमान अपघात आणि घटना याचा तपास सुरू करण्यात आला आहे. कालबद्ध पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने हा तपास होईल. या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे.

मग सीसीटीव्हीत विमान कसं दिसतंय?

बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाल्याचे अनेकजण सांगत आहेत. पण खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं. जर तिथं धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीत इतक्या दुरून हे कसं दिसतंय असा सवाल उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांमधील एकही नेता ठामपणे यावर का बोलत नाही. अजितदादांच्या पक्षातील ज्येष्ठ प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ अथवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलं आहे, असा सवालही अंधारे यांनी विचारला. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते का बोलत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

CID चा तपास सुरू

दरम्यान अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी मतमतांतरं व्यक्त होत असल्याने याप्रकरणी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या विमान अपघाताचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने पण सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विविध कोनातून या अपघाताची चौकशी होईल आणि तथ्य समोर येईल. तसेच लोकांच्या मनातील शंकाकुशंका व्यक्त होत असताना या अहवालातून अनेक मुद्दे समोर येतील. ही तांत्रिक चूक होती की पायलटची चूक होती हे समोर येईल.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद