
Ajit Pawar Plane Crash Investigation: बारामती विमानतळाजवळ भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचं निधन झाले. या निधनाने राज्याला मोठा धक्का बसला. या विमान अपघातावर मतमतांतरं व्यक्त झाली. काहींनी हा घातपात असल्याचा आरोप केला. काहींनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली. या विमान अपघाताप्रकरणी तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेच. केंद्रीय हवाई उड्डायण मंत्रालयाने तपास सुरू केला आहे. तर लोकांच्या मनातील संशय दूर व्हावा यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याप्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून(CID) चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अहवालातून काय बाबी समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विमान अपघात तपास ब्युरोकडून तपास सुरु
विमान अपघात तपास ब्युरोकडून (AAIB) कडून तपास सुरू झाला आहे. तीन सदस्यीय पथकाने ब्लॅकबॉक्स ताब्यात घेतला आहे. विमान अपघात आणि घटना याचा तपास सुरू करण्यात आला आहे. कालबद्ध पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने हा तपास होईल. या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे.
मग सीसीटीव्हीत विमान कसं दिसतंय?
बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाल्याचे अनेकजण सांगत आहेत. पण खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं. जर तिथं धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीत इतक्या दुरून हे कसं दिसतंय असा सवाल उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांमधील एकही नेता ठामपणे यावर का बोलत नाही. अजितदादांच्या पक्षातील ज्येष्ठ प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ अथवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलं आहे, असा सवालही अंधारे यांनी विचारला. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते का बोलत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
CID चा तपास सुरू
दरम्यान अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी मतमतांतरं व्यक्त होत असल्याने याप्रकरणी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या विमान अपघाताचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने पण सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विविध कोनातून या अपघाताची चौकशी होईल आणि तथ्य समोर येईल. तसेच लोकांच्या मनातील शंकाकुशंका व्यक्त होत असताना या अहवालातून अनेक मुद्दे समोर येतील. ही तांत्रिक चूक होती की पायलटची चूक होती हे समोर येईल.