AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजोय मेहतांचं अखेर पुनर्वसन; महारेराच्या अध्यक्षपदाची घेतली शपथ

अजोय मेहता यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपदही सांभाळले होते. (Ajoy Mehta take Sworn As a MahaRERA chairman)

अजोय मेहतांचं अखेर पुनर्वसन; महारेराच्या अध्यक्षपदाची घेतली शपथ
अजोय मेहता
| Updated on: Feb 15, 2021 | 7:17 PM
Share

मुंबई : माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजोय मेहता यांना मंत्रालयात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अध्यक्ष, सदस्य, अधिकारी व इतर कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम 2017 मधील नियम 9(1) व 9(2) मधील तरतुदीनुसार श्री.मेहता यांना शपथ देण्यात आली. (Ajoy Mehta take Sworn As a MahaRERA chairman)

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, महारेराचे सदस्य तसेच माजी अपर मुख्य सचिव विजय सतबीर सिंग, महारेरा अपिलीय प्राधिकरणाचे सदस्य एस. एस. संधू, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता (Ajoy Mehta) यांची या पदी नियुक्ती करण्यात आली होती. गृहनिर्माण खात्याने बुधवारी (10 फेब्रुवारी) यासंदर्भातील आदेश जारी केला होता. गौतम चॅटर्जी हे निवृत्त झाल्यामुळे हे पद रिकामे होते.

कोण आहेत अजोय मेहता?

अजोय मेहता हे 1984च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. तर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होण्यापूर्वी अजोय मेहता यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपदही सांभाळले होते.

काही दिवसांपूर्वीच अजोय मेहता प्रधान सचिव पदावरून निवृत्त झाले होते. यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

महारेराच्या अध्यक्षपदासाठी मेहतांची लॉबिंग?

अजोय मेहता महारेराच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग करत असल्याची माहिती समोर आली होती. मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती होण्याची दाट शक्यता होती. ती अखेर खरी ठरली.

काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध

राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मेहता यांना महारेराचे अध्यक्ष बनविण्यास विरोध केला होता. मुख्य सचिव असताना मेहता यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्या नाराजीतून दोन्ही काँग्रेसचे नेते मेहता यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यास इच्छुक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. (Ajoy Mehta take Sworn As a MahaRERA chairman)

संबंधित बातम्या : 

अजोय मेहता यांची ‘महारेरा’च्या अध्यक्षपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.