मतदान न केल्यामुळे अक्षय कुमार ट्विटरवर ट्रोल

मतदान न केल्यामुळे अक्षय कुमार ट्विटरवर ट्रोल

महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. मुंबईसह संपूर्ण राज्यात मतदान पार पडले. यावेळी मुंबईकरांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले.

सचिन पाटील

| Edited By:

Oct 22, 2019 | 12:05 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. मुंबईसह संपूर्ण राज्यात मतदान पार पडले. यावेळी मुंबईकरांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्यासोबतच अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी मतदान (actor akshay kumar voting) केलं. तर काहींनी मतदानही केलं नाही. ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमारचे (actor akshay kumar voting) नाव घेतलं जात आहे.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने काल (21 ऑक्टोबर) मतदान केलं. त्यावेळी सर्वांचे लक्ष सलमानकडे होते. त्याने मतदान करत इतरांनाही मतदान करण्याचे आव्हान केले. सलमानशिवाय शाहरुख, दीपिका पादुकोण, ऋषी कपूर, ऐश्वर्या राय आणि आमिर खाननेही मतदान केलं.

काल झालेल्या मतदानात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांनी मतदान केले नाही. पण ट्विटरवर लोक सकाळपासून अभिनेता अक्षय कुमारच्या मतदानाची वाट पाहत होते. त्याने यंदाही मतदान न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याला ट्रोल करण्यात आले.

अक्षय कुमार भारतातील कोणत्याही निवडणुकीत मतदान करु शकत नाही. अक्षय कुमारकडे भारतीय पासपोर्ट नाही आणि त्याच्याकडे कॅनडिअन नागरिकत्व आहे. त्यामुळे भारतीय संविधाननुसार अक्षयला मतदानाचा अधिकार नाही.

गेल्यावेळीही लोकसभेला अक्षय कुमारला सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. ट्विटरवर अनेकांनी अक्षयला मतदान करण्यासाठी सांगितले. तर काहींनी अक्षयला टॅग करत म्हटले, जर तुम्ही भारतावर प्रेम करत असाल, तर मतदान करा, तर काहींनी त्याला मतदान केल्यानंतर सेल्फी फोटो पोस्ट करण्यास सांगितले.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी एका पत्रकाराने अक्षयला मतदानासंबधित प्रश्न विचारला होता. त्याचे अक्षय कुमारने काही उत्तर दिले नव्हते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें