Amit Raj Thackeray: ‘शिवतीर्था’वर पाळणा हलला, मिताली ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ; राज ठाकरे झाले आजोबा

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे आजोबा- आजी झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांच्या पत्नी मिताली ठाकरे (Mitali Thackeray) यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.

Amit Raj Thackeray: 'शिवतीर्था'वर पाळणा हलला, मिताली ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ; राज ठाकरे झाले आजोबा
'शिवतीर्था'वर पाळणा हलला, मिताली ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ; राज ठाकरे झाले आजोबाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 2:26 PM

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे हे आजोबा- आजी झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांच्या पत्नी मिताली ठाकरे (Mitali Thackeray) यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे शिवतिर्थावर सध्या आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, मिताली ठाकरे आणि बाळ सुखरूप असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज यांच्या घरी एप्रिल महिन्यात नवीन पाहुणा येणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे ठाकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता, तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते.

अमित ठाकरेंवर नवी जबाबदारी

अमित ठाकरे हे सध्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारीही देण्यात आली आहे. जबाबदारीचा भाग म्हणून अमित ठाकरे यांनी सध्या नाशिकमधील संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याशिवाय ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतही त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवाजी पार्कवरील मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातही अमित ठाकरे स्टेजवर दिसले होते.

मिताली ठाकरे कोण आहेत?

प्रसिद्ध बॅरिएट्रीक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांच्या मिताली या कन्या आहेत. मिताली स्वत: फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. राज यांची कन्या ऊर्वशी ठाकरे आणि मिताली या दोघी मैत्रीणी असून त्यांनी ‘द रॉक’ हा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला होता.

अमित-मिताली यांची लव्ह स्टोरी

अमित आणि मिताली हे कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. साखरपुड्याच्या आधी तब्बल दहा वर्षापासून अमित आणि मिताली दोघेही एकमेकांना ओळखत होते. अमित ठाकरे पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते. तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होत्या. कॉलेजमध्ये असतानाच त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि पुढे लग्नात झालं. मिताली आणि उर्वशी या दोघी मैत्रिणी असल्यामुळे कृष्णकुंजवर मितालीचे सारखं येणं जाणं सुरु होतं. मात्र काही दिवसानंतर या दोघांनी आपल्या नात्याबद्दल घरात सांगितले आणि दोघांच्या घरच्यांनीही याला होकार दिला.

संबंधित बातम्या:

Amit Raj Thackeray | ‘शिवतीर्था’वर पाळणा हलणार, राज ठाकरे होणार आजोबा

अमित ठाकरेंच्या खांद्यावर ‘मनसे’ची मोठी जबाबदारी; राज यांनी साधला मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडमध्ये, अमित ठाकरे मैदानात; ‘शिवजनसंपर्क अभियानाला’ सुरुवात

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....