AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Raj Thackeray | ‘शिवतीर्था’वर पाळणा हलणार, राज ठाकरे होणार आजोबा

राज ठाकरेंच्या सूनबाई मिताली आणि पुत्र अमित ठाकरे आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे ठाकरे परिवारात उत्साहाचं वातावरण आहे. येत्या एप्रिल महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती आहे.

Amit Raj Thackeray | 'शिवतीर्था'वर पाळणा हलणार, राज ठाकरे होणार आजोबा
मनसे अध्यक्षांच्या घरी गोड बातमीImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 8:44 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कुटुंबात गोड बातमी असल्याचं वृत्त आहे. राज ठाकरे लवकरच आजोबा होणार आहेत. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सूनबाई मिताली ठाकरे यांच्याकडे गुड न्यूज आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या खांद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची धुरा देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. यावेळी अमित ठाकरेंच्या राजकीय प्रमोशनची चर्चा रंगली होती. मात्र वैयक्तिक आयुष्यातही आता त्यांचं ‘बाबा’ म्हणून प्रमोशन होणार असल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरेंच्या कुटुंबाचे नवीन निवासस्थान ‘शिवतीर्था’वर सध्या आनंदाचं वातावरण आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आनंदात असून येत्या एप्रिल महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती आहे.

राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ निवासस्थान सोडून नुकतेच सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या जागेत राहण्यासाठी गेले. या नव्या वास्तूतील आनंदाच्या वातावरणात अधिकच भर पडणार आहे. कारण मिताली आणि अमित ठाकरे आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे ठाकरे परिवारात उत्साहाचं वातावरण आहे.

कोण आहेत मिताली ठाकरे?

मिताली ठाकरे फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. मिताली प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची मुलगी आहे. तसेच राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे आणि मिताली बोरुडे या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींनी मिळून ‘द रॉक’ हा कपड्यांचा ब्रँड त्यांनी लाँच केला होता.

अमित आणि मितालीची लव्ह स्टोरी

अमित आणि मिताली यांची ओळख साखरपुड्याच्या जवळपास दहा वर्ष आधी झाली होती. कॉलेजमध्ये असतानाच अमित आणि मिताली एकमेकांच्या प्रेमात पडले. अमित ठाकरे पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते. तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होत्या. कॉलेजमध्ये असताना या दोघांची ओळख झाली आणि काही वर्षांनी या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

अमित यांनी मितालीला प्रपोज केलं आणि मितालीनेही त्याला होकार दिला. मिताली आणि उर्वशी या दोघी मैत्रिणी असल्यामुळे कृष्णकुंजवर मितालीचे सारखं येणं जाणं सुरु होतं. मात्र काही दिवसानंतर या दोघांनी आपल्या नात्याबद्दल घरात सांगितले आणि दोघांच्या घरच्यांनीही याला होकार दिला.

अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता, तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते.

संबंधित बातम्या :

अमित ठाकरेंच्या खांद्यावर ‘मनसे’ची मोठी जबाबदारी; राज यांनी साधला मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडमध्ये, अमित ठाकरे मैदानात; ‘शिवजनसंपर्क अभियानाला’ सुरुवात

लोढा-राज यांच्या भेटीचे गुपित काय; मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दोस्ताना होणार का?

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.