अमित ठाकरेंकडे मनसे विद्यार्थी सेनेची धुरा?; अमित ठाकरे, संदीप देशपांडे राज यांच्या भेटीसाठी नाशिकमध्ये दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेत मोठी उलथापलथ होण्याचे संकेत मिळत आहेत. (amit thackeray)

अमित ठाकरेंकडे मनसे विद्यार्थी सेनेची धुरा?; अमित ठाकरे, संदीप देशपांडे राज यांच्या भेटीसाठी नाशिकमध्ये दाखल
मनसे नेते अमित ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 10:43 AM

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेत मोठी उलथापलथ होण्याचे संकेत मिळत आहेत. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा थेट अमित ठाकरेंकडेच जाणार असून त्याबाबतची आजच घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (amit thackeray will be the mns student unit’s next presidents?)

आदित्य शिरोडकर यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. शिरोडकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आता मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद अमित ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे तातडीने नाशिकला दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये राज ठाकरे यांची भेट घेऊन हे दोन्ही नेते विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा करणार आहेत. कदाचित राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेऊन अमित ठाकरे यांची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

मुंबई महापालिकेसाठी पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आदित्य शिरोडकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शिरोडकर यांनी पक्ष सोडल्याने विद्यार्थी संघटना खिळखिळी होऊ नये म्हणून अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची धुरा देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमित यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची धुरा दिल्यास विद्यार्थी संघटना डॅमेज होणार नाही, उलट तरुणाईचा मनसेकडे ओघ वाढेल. तसेच विद्यार्थी संघटनेचा पालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत उपयोगही करता येईल. त्यामुळे अमित यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची सूत्रे दिली जाऊ शकतात, असं सांगितलं जातं.

संदीप देशपांडेंची टीका

शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच टीका केली आहे. मंत्रालयात जायला वेळ नाही. लॉकडाऊनमुळे लोक आत्महत्या करतायत तिथे बघायला वेळ नाही. बाकी घरी बोलवून धागे बांधायला वेळ आहे. आणि करोना काळात राजकारण करू नका म्हणून अक्कल शिकवायला सर्वात पुढे. आमचा मुख्यमंत्री जगात भारी, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे. (amit thackeray will be the mns student unit’s next presidents?)

संबंधित बातम्या:

मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरुवात; अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास 8 वर्षांपूर्वी भाजपचा होकार, महापौर पेडणेकरांनी पाठिंब्याचं लेटरच दाखवलं!

(amit thackeray will be the mns student unit’s next presidents?)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.