शुभेच्छा देताना मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख, अमृता फडणवीस टीकेच्या धनी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना, त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता (Father of our Country) असं म्हटलं आहे.

शुभेच्छा देताना मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख, अमृता फडणवीस टीकेच्या धनी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना, त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता (Father of our Country) असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. देश राष्ट्रपिता म्हणून केवळ महात्मा गांधी यांचाच उल्लेख करतो पण अमृता फडणवीस यांनी थेट मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

अमृता फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

अमृता फडणवीस यांनी ट्विट करताना, “आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी, जे समाजाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेण्याची प्रेरणा देतात त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”. असं म्हटलं आहे.

या ट्विटसोबत अमृता फडणवीस यांनी ओ रे मनवा तू तो बावरा है, हे स्वत:च्या आवाजात गायलेलं गाणं ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवताना दिसतात.

अमृता फडणवीस यापूर्वी त्यांच्या सेल्फीमुळे वादात अडकल्या होत्या. मुंबई ते गोवा या जलमार्गावरील ‘आंग्रीया’ क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढला होता. सुरक्षा रक्षकांना डावलून त्यांनी सेल्फी घेतल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI