सत्तेच्या तुकड्यासाठी काकांचा खंजीर गोड मानून घ्या; अनिल बोंडेंचा नाना पटोलेंना सल्ला आणि खरपूस समाचारही….

| Updated on: May 12, 2022 | 7:40 PM

अनिल बोंडे यांनी जे ट्विविट केले आहे, त्यामध्ये नाना पटोले यांना त्यांनी सांगितले आहे की, तुम्हाला अजून सवय झाली नाही का खंजीर खुपसून घ्यायची म्हणत त्यांनी राजकारणातील बड्या बड्या नेत्यांची नावं घेऊन त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आणि सत्तेच्या तुकड्यासाठी तुम्ही गोड मानून घ्या असा उपदेशही दिला आहे.

सत्तेच्या तुकड्यासाठी काकांचा खंजीर गोड मानून घ्या; अनिल बोंडेंचा नाना पटोलेंना सल्ला आणि खरपूस समाचारही....
नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर अनिल बोंडेचे ट्विविट
Follow us on

मुंबईः स्थानीक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात राष्ट्रवादीने (National Congress Party) आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका काँग्रेसच्या नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. त्यानंतर राजकारणात त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठी खबबळ माजली. त्यांच्या या विधानामुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले. त्यामुळेच भाजपचे आमदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी ट्विट करत त्यांच्या या विधनाचा परामर्श लावला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नाना पटोलेंच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीतील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे का हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला असल्याचे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी ट्विट करत त्यांनी राष्ट्रवादीचाही खरपूस समाचार घेतला आहे.

सत्तेच्या तुकड्यासाठी तुम्ही गोड मानून घ्या

अनिल बोंडे यांनी जे ट्विविट केले आहे, त्यामध्ये नाना पटोले यांना त्यांनी सांगितले आहे की, तुम्हाला अजून सवय झाली नाही का खंजीर खुपसून घ्यायची म्हणत त्यांनी राजकारणातील बड्या बड्या नेत्यांची नावं घेऊन त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आणि सत्तेच्या तुकड्यासाठी तुम्ही गोड मानून घ्या असा उपदेशही दिला आहे.

काय म्हणाले नाना पटोले

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे, या महाविकास आघाडीचा एवढाच निर्णय आहे की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणूनच पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन या महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले गेले. याबरोबरच स्थानीक स्वराज्य संस्थांसाठीही महाविकास आघाडी सरकारचे पदाधिकारी देण्यासाठी प्रयत्न केले गेले, आणि हीच भूमिका कायम होती.

राष्ट्रवादी भाजपसोबत

पण भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादीने सरळ भाजपसोबत जाऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. भिवंडीमध्येही आमचे 19 नगरसेवक हे राष्ट्रवादामध्ये घेतले, त्यामुळे दोस्ती करायची तर प्रामाणिक करायची, आणि दुश्मनी करायची तर समोरुन केली पाहिजे, सोबत राहून हे करत असेल तर हे वाईट आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेपासून सत्तेत आले आहे.

नानांच्या वक्तव्याची चर्चा

त्यावेळेपासून राष्ट्रवादी चुकीचे वागत असल्याचे नाना पटोले यांनी भंडारा गोंदियातील स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांविषयी आपले मत व्यक्त केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होता. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतरही राजकारणातही जोरदार चर्चा करण्यात आली.