AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70 हजार रिक्षाचालकांच्या खात्यात पैसे जमा, अनुदानासाठी अर्ज करण्याचं अनिल परब यांचं आवाहन

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.

70 हजार रिक्षाचालकांच्या खात्यात पैसे जमा, अनुदानासाठी अर्ज करण्याचं अनिल परब यांचं आवाहन
अनिल परब, परिवहन मंत्री.
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 5:14 PM
Share

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 71 हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 465 रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. उर्वरित परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे (Anil Parab appeal rickshaw driver to apply for financial assistance amid corona lockdown).

कोरोनाच्या निर्बंध काळात दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांना एकूण 108 कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. राज्यात 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

1 लाख 5 हजार रिक्षा चालकांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचे निर्देश

परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तेथे 22 मे 2021 पासून परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतोय. आतापर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 465 रिक्षा चालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यापैकी 71 हजार 40 रिक्षा चालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले. त्याचप्रमाणे 1 लाख 5 हजार रिक्षा चालकांच्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्याबाबत NPCI (National Payment Corporation Of India) यांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

सानुग्रह अनुदानासाठी रिक्षा चालकाकडे आधार क्रमांक असणं आवश्यक

याबाबतची माहिती विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याकरीता परवानाधारक रिक्षा चालकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. तो ज्या बँक खात्याशी जोडणी केलेला आहे त्या खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येत आहे.

“रिक्षा परवानाधारकांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित करावे”

रिक्षा परवानाधारकांना नवीन आधार क्रमांक काढण्यासाठी व मोबाईल क्रमांकाचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये सुध्दा आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज दैनंदिनरित्या निकाली काढण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांमध्ये कर्मचारी/अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नागरी संपर्क केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सदर योजनेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 18001208040 या टोल फ्री नंबरवर आलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येत आहेत. रिक्षा परवानाधारकांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित करावे आणि आपला मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक करावा, असं आवाहन मंत्री परब यांनी केलं.

हेही वाचा :

मोठी बातमी! राज्य सरकार एसटीला देणार 600 कोटी; कामगारांना रखडलेला पगार मिळणार!

मोठी बातमी ! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना 6 महिन्यांत नोकरी, 5 लाख रुपयांची आर्थिक मदत

परिवहन विभागातील गैरव्यवहार प्रकरण, तक्रारकर्ते गजेंद्र पाटील चौकशीसाठी हजर, हाय प्रोफाईल केसचं काय होणार?

व्हिडीओ पाहा :

Anil Parab appeal rickshaw driver to apply for financial assistance amid corona lockdown

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.