सिमेंट उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतनश्रेणी लागू करण्यास तत्वत: मान्यता – हसन मुश्रीफ

सिमेंट उद्योग आणि सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या हितासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली मागणी लक्षात घेवून यासंदर्भातील परिपत्रकात बदल करुन या उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतन लागू करणारे परिपत्रक काढणे तसेच कामगारांना 21 हजार रुपये किमान वेतन लागू करण्यासंदर्भात तत्वत: मान्यता देण्यात येत असल्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले

सिमेंट उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतनश्रेणी लागू करण्यास तत्वत: मान्यता - हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 1:22 PM

मुंबई : सिमेंट उद्योग आणि सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या हितासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली मागणी लक्षात घेवून यासंदर्भातील परिपत्रकात बदल करुन या उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतन लागू करणारे परिपत्रक काढणे तसेच कामगारांना 21 हजार रुपये किमान वेतन लागू करण्यासंदर्भात तत्वत: मान्यता देण्यात येत असल्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले (Approval in principle to apply new minimum wage to workers in the cement industry said by Labor Minister Hassan Mushrif).

सिमेंट उद्योग आणि सिमेंटवर आधारित उद्योग यातील कामगारांना किमान समान वेतन लागू करण्यात आलेले आहे. सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना सध्या अल्प वेतन मिळत आहे. त्यामुळे या परिपत्रकात बदल करून किमान वेतन यादीमध्ये दुरुस्ती करावी आणि सिमेंट उद्योगातील कामगारांना एकवीस हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती.

मंत्रालयात कामगार मंत्री मुश्रीफ यांच्या दालनात सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतन वाढ करण्यासंदर्भातील परिपत्रकात दुरूस्ती करून कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल, कामगार आयुक्त कल्याणकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, वाढती महागाई लक्षात घेता श्रमिकांना जीवन जगताना अडचणी येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पाच सिमेंट उद्योग असून यामध्ये किमान 15 ते 20 हजार कामगार काम करीत आहे. सिमेंट उद्योग आणि सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना समान किमान वेतन लागू करण्याचे परिपत्रक लागू करण्यात आले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन सिमेंट उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत असल्याची बाब विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेनी निवेदन देऊन दिली. तसेच कामगारांना किमान 21 हजार रुपये वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली.

किमान वेतन समितीसमोर सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांबाबतचा प्रस्ताव सादर करावा

कामगारांना कोणत्याही परिस्थ‍ितीत योग्य किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. सध्या कोरोनामुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतनवाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विविध संघटनांच्या, श्रमिक संघटनांच्या मागण्यांच्या माहितीबाबतही चर्चा केली.

Approval in principle to apply new minimum wage to workers in the cement industry said by Labor Minister Hassan Mushrif

संबंधित बातम्या :

बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन फडणवीसांचं मविआला चॅलेंज

पंकजा म्हणाल्या, ‘माझे नेते मोदी-शाहा’, आता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.