मंत्री पब-पार्टीत गुंग, कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ स्टाईलमध्ये, आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंकडे बोट?

भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी आणि विशेषत: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

मंत्री पब-पार्टीत गुंग, कार्यकर्ते 'गोली मार भेजे में' स्टाईलमध्ये, आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंकडे बोट?
Ashish Shelar, Aaditya Thackeray
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 12:19 PM

मुंबई : पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांवर भाजपने हल्लाबोल सुरु केला आहे. MIM खासदार इम्तियाज जलील यांनी व्हिडीओ ट्विट करुन थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कारवाईबाबत प्रश्न विचारले. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि विशेषत: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. (Ashish Shelar attacks Mahavikas aaghadi leader Shiv Sainiks brandishing revolvers on Pune Mumbai expressway)

आशिष शेलार म्हणाले, “ज्या पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो बघितल्यावर स्पष्ट होतं की, यावेळी राज्याच्या सत्तेत बसलेले युवा मंत्री पब-पार्टी आणि फिल्मी दुनिया याच्यातच वावरत आहे. कार्यकर्ते ‘गोली मार भेजे मे’ अशापद्धतीने फिल्मी स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत. दुर्दैवाने हे सर्व महाराष्ट्र पाहतो आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सरकारने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिप्रेत असलेलं वर्तन करावं. स्वतःच्या कार्यकर्त्यांना आवरावं. फिल्मी दुनिया पाणी, पार्टी ही काही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन नाही”

लोकल रेल्वेवरुनही टीकास्त्र

यावेळी आशिष शेलार यांनी राज्य सरकारने लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत घेतलेला निर्णय आणि त्याबाबत घातलेल्या अटींवरुनही टीकास्त्र सोडलं. “राज्य सरकारने लोकल ट्रेनच्या बाबतीत जो निर्णय घेतला, तो सर्व विचार करून घेतला असावा अशी आमची अपेक्षा आहे. पण ज्या वेळेला आपण सर्व विचारांती असे म्हणतो तेव्हा तो सर्व समावेश अपेक्षित आहे. आज घेतलेल्या निर्णयामुळे सुविधांपेक्षा गोंधळ जास्त आणि त्या ठिकाणी सोई पेक्षा अडचणी जास्त अशा स्वरूपाचा आहे. प्रवाशांच्या मनात गोंधळ झालेला आहे”, असं शेलार म्हणाले.

राज्य सरकारने विनंती केली आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या रेल्वे मंडळांनी मान्य केली आहे. मला राज्य सरकारला विनंती करायची आहे की आपण स्टेशनवर आणि प्लॅटफॉर्मवर जो गोंधळ होतो, तो कमीत कमी व्हावा किंवा होऊच नये या दिशेने एसओपी लवकर बनवावी. रेल्वे पोलिसांबरोबर तातडीची बैठक बोलवावी, त्याठिकाणी अजून अडचणी निर्माण होणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण आणि अशा पद्धतीचे सूचनाफलक याची व्यवस्था करावी, या सगळ्यांची बैठक तातडीने घेतली पाहिजे, असं आशिष शेलार यांनी नमूद केलं.

इम्तियाज जलील यांच्याकडून व्हिडीओ शेअर 

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) गंभीर आरोप केला आहे. काही शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune express way) पिस्तूल दाखवल्याचा आरोप जलील यांनी केलाय. एका चारचाकी वाहनामधून समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवतानाचा व्हिडीओही त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच, गाडीवरचा शिवसेनेचा लोगोच सगळं काही सांगत असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अशा प्रकाराची दखल घेणार का?, असा सवालही जलील यांनी केला आहे.

पिस्तूल दाखवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पिस्तूल दाखवत प्रवास करणाऱ्या आरोपींविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात आर्म ऍक्ट 325 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

भर रस्त्यावर शिवसैनिकांची पिस्तूल दाखवून दादागिरी?, व्हिडीओ दाखवत इम्तियाज जलील यांची कारवाईची मागणी 

(Ashish Shelar attacks Mahavikas aaghadi leader Shiv Sainiks brandishing revolvers on Pune Mumbai expressway)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.