AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा तर बेशरमपणाचा कळस, संजय राठोड यांना अटक करा’, राठोडांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजप संतप्त

निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हेसुद्धा संजय राठोड यांच्या वक्तव्यावरून दिसून येत होतं, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. (Atul Bhatkhalkar Sanjay Rathore Pooja Chavan)

'हा तर बेशरमपणाचा कळस, संजय राठोड यांना अटक करा', राठोडांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजप संतप्त
अतुल भातखळकर आणि संजय राठोड
| Updated on: Feb 23, 2021 | 3:08 PM
Share

मुंबई : “निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांच्या वक्तव्यावरून दिसून येत होतं. संजय राठोड यांची आजची अवस्था म्हणजे सामनामधल्या भेदरलेल्या सरपंचसारखी झालीय,” असे टीकेचे आसूड भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राठोड यांच्यावर ओढले. पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड तब्बल 15 दिवस अज्ञातवासात होते. त्यांनतर त्यांनी आज सहकुटुंब (23 फेब्रुवारी)  पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Atul Bhatkhalkar criticize Sanjay Rathore on Pooja Chavan suicide case)

संजय राठोड यांना अटक करा

“निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन दिसून येत होतं. संजय राठोड यांची आजची अवस्था म्हणजे सामनामधल्या भेदरलेल्या सरपंचसारखी झालीय. त्यांनी एकाही प्रश्नचं उत्तर दिलं नाही. फक्त समाजाच्या नावावर भावनिक शब्द बोलून ते निघून गेले. ऑडिओ क्लिपमधल्या आवाजावर ते बोललेले नाहीत. आईबाबांचं नाव घेऊन ते निघून गेले,” असे भातखळकर म्हणाले. तसेच, संजय राठोड यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न

राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. त्यांनतर विधानरपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण यांनीसुद्धा त्यांच्यावर टीका केली. “संजय राठोड यांनी फक्त मीडियासमोर येण्याचं नाटक केलं. समाजाचा दबाव निर्माण करुन त्यांनी प्रसारमाध्यमांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला. वाटलं होतं की ते प्रायश्चित्त घेतील. राजीनामा देतील आणि निर्दोषत्व सिद्ध करतील. पण सत्ताच आपल्याला यातून सोडवू शकत असल्याचं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नाही. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला कसा झाला?, याबाबत भाष्य केलं नाही. त्यांनी सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला,” असे दरेकर म्हणाले.

माझं राजकीय, वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

दरम्यान, पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर संजय राठोड यांनी समाजमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात घाणेरडे राजकारण करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच, मी मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त आणि ओबीसी समाजाचा नेता आहे. या आरोपांच्या माध्यमातून माझं राजकीय आणि वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी केले.

इतर बातम्या :

एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती

PHOTO: अन् पत्नीने संजय राठोडांना गर्दीतून वाट काढून दिली

“वाटलं होतं राठोड राजीनामा देतील, हा तर सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न”, प्रविण दरेकरांचा घणाघात

(Atul Bhatkhalkar criticize Sanjay Rathore on Pooja Chavan suicide case)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.