AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो मालमत्ता कर भरा अन्यथा लिलाव अटळ, महापालिका पाठवणार नोटीस

मालमत्ता कर (Property tax) थकल्याने मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) थकीत कर असलेल्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आता मालमत्ता जप्त केलेल्या थकबाकीदारांना महापालिका (Municipal Corporation) 15 दिवसांची अंतिम नोटीस देणार आहे.

मुंबईकरांनो मालमत्ता कर भरा अन्यथा लिलाव अटळ, महापालिका पाठवणार नोटीस
...तर थकीत मालमत्तांचा लिलाव
| Updated on: Mar 30, 2022 | 8:15 AM
Share

मुंबई : मालमत्ता कर (Property tax) थकल्याने मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) थकीत कर असलेल्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आता मालमत्ता जप्त केलेल्या थकबाकीदारांना महापालिका (Municipal Corporation) 15 दिवसांची अंतिम नोटीस देणार आहे. या मुदतीत थकबाकी भरली नाही तर मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यासाठी जप्त मालमत्तांचे मूल्य ठरवण्यासाठी निविदा मागवून लवकरच संस्थेची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या कस संकलन व निर्धार विभागाचे सहआुक्त सुनील धामणे यांनी दिली आहे. थकबाकीदारांकडील मालमत्ता कर वसुलीसाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यानुसार यंदा मालमत्ता करारतून सहा हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट ठेवण्यात आले होते. या टार्गेटनुसार आतापर्यंत 5030 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास 84 टक्के वसुली पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

5 हजार 821 मालमत्ता जप्त

पालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी केलेल्या कारवाईत आतापर्यंत तब्बल पाच हजार 821 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये इमारती, भूखंड, कार्यालये, हेलिकॉप्टरस वाहने, संगणक, एसी अशा वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये तीन हजार 978 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर जप्ती कारवाईतून आतापर्यंत 728 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी महापालिकेने कायद्यातही तरतुद करून घेतली आहे.

थकीत मालमत्तेवर दोन टक्के दंड

दरम्यान महापालिकेकडून थकीत मालमत्ता धारकांच्या आतापर्यंत पाच हजार 821 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आता दोन टक्के दंडासह कराची वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. जर नोटीस पाठवूनही कराचा भरण न केल्यास संबंधित मालमत्तेचा महापालिकेच्या वतीने लिलाव करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

‘अशी ही बनवाबनवी’ एकदा पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला!

कारागृहातील कैद्यांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, 7 टक्के व्याजदराचे वैयक्तिक कर्ज मिळणार!

दोन वर्षानंतर साजरी होणार बाबासाहेब आंबेडकरांची जयंती; 14 एप्रिल रोजी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी;मार्गदर्शक सूचना येत्या चार दिवसात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.