AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangzeb Tomb : औरंगजेबाचे थडगे सरकार पाडणार? मुख्यमंत्री म्हणाले घाईने….

Aurangzeb Tomb News : छावा चित्रपटानंतर अनेक परिणाम दिसून येत आहे. यापूर्वी इतिहासात नमूद घटनांची कोणी दखल घेतली नाही. पण एका चित्रपटाने मोठा परिणाम साधला आहे. औरंगजेबाची कबर, थडगे हटवण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Aurangzeb Tomb : औरंगजेबाचे थडगे सरकार पाडणार? मुख्यमंत्री म्हणाले घाईने....
औरंगजेबाचे थडके कधी हटवणार?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 09, 2025 | 9:19 AM
Share

छावा चित्रपटाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. यापूर्वी इतिहासात छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याची नोंद आहे. त्यावरून कोणी गेल्या 300-350 वर्षात औरंगजेबाचे थडगे हटवण्याची मागणी उभ्या महाराष्ट्रात कोणी केली नाही. आता एका चित्रपटाने परिणाम साधला. भाजपासहित अनेक हिंदू संघटना औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आहेत. या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

अबु आझमींचे औरंगजेब प्रेम उफाळले

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी ऐनवेळी औरंगजेबावर स्तुती सुमनं उधळली. त्यामागे काय धोरण आहे, तो राजकारणाचा भाग आहे. पण त्यांच्या या कृतीने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. आझमींवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी या वक्तव्याचे अचूक टायमिंग हा चर्चेचा विषय आहे. श्री गुरु तेग बहादूर जी महाराज यांच्या 350 व्या शहीद वर्षाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेबाच्या थडग्याविषयी वक्तव्य केले.

काँग्रेसवर गंभीर आरोप

औरंगजेबाच्या थडग्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली. ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या गंभीर आरोपावर आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.

औरंगजेबाची कबर हटवणार?

औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. आता कबरीला देण्यात आलेले हे विशेष संरक्षण कायद्याचं पालन करून हटवणं अथवा बदलवणं आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहिल हे पाहा असे संकेत दिले आहेत.

27 वर्षे मराठ्यांशी लढणारा औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे झाला. त्यावेळी तो 89 वर्षांचा होता. 1707 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या गुरूच्या कबरीजवळच आपली कबर बांधण्यात आली. सुफी संत शेख झैनुद्दीन दर्गा परिसरातच त्याची कबर आहे. त्यासाठी त्यावेळी 14 रुपये 12 आणे इतका खर्च करण्याची ताकद त्याने मृत्यूपत्रातच दिली होती. खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.