बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणी महत्वाचे अपडेट्स; 6 आरोपींची ओळख पटली

Baba Siddique Shot Dead Accused Updates : राष्ट्रवादीटचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात सामील असणाऱ्या आरोपींची ओळख पटली आहे. सहा आरोपींची ओळख पटली आहे. वाचा सविस्तर....

बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणी महत्वाचे अपडेट्स; 6 आरोपींची ओळख पटली
Baba Siddique
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 11:20 AM

माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची परवा रात्री (12 ऑक्टोबर) हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे भागात त्यांच्यावर गोळीबार झाला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील 6 आरोपींची ओळख पटली आहे. तर तीन जणांना या प्रकरणात अटक झाली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने पुण्यातून प्रविण लोणकरला अटक केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली याबाबतची पोस्ट शबू लोणकर याने फेसबुकवर शेअर केली होती. या शुबु लोणकरचा प्रविण लोणकर हा भाऊ आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात 3 जणांना अटक

बाबा सिद्दिकी यांच्या झालेल्या हत्या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक झाली आहे. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप या दोङांना पोलिसांनी हत्या झालेल्या ठिकाणापासून काहीच अंतरावरून अटक केली. तर शुबू लोणकरचा भाऊ प्रविण लोणकरला आता पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे. त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

ओळख पटलेल्या आरोपींची नावं

गुरमेल बलजीत सिंह

धर्मराज राजेश कश्यप

शिव कुमार गौतम ऊर्फ शिवा

मोहम्मद जसीन अख्तर

शिबू लोणकर

प्रवीण लोणकर

मुंबई क्राईम ब्रँचमने शुबू लोणकर याना अभियुक्त बनवलं आहे. सध्या तो फरार आहे. पण शुबूपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी त्याच्या भावाला अटक केली आहे. परवा दिवशी बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली. याबाबतची पोस्ट शुबूने फेसबुकवर शेअर केली होती. त्यामुळे पोलीस आता शुबू लोणकरचा शोध घेत आहेत.

बाबा सिद्दिकी यांची हत्या

राज्य मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली आहे. बाबा सिद्दिकी हे याआधी काँग्रेसमध्ये होते. काहीच दिवसांआधी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयातून बाहेर निघत असताना बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. मुंबईतील मरीन लाईन्स भागातील बडा कबरस्तानमध्ये बाबा सिद्दिकी यांचा दफनविधी करण्यात आला. ‘सुपुर्द- ए – खाक’ बाबा सिद्दिकी यांच्यावर करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.