राम मंदिर उद्धव ठाकरेंच्या श्रद्धेचा विषय, कोरोना अपयश लपवण्यासाठी भाजपकडून पायाभरणीचा कार्यक्रम : थोरात

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राम मंदिर पायाभरणीच्या मुद्द्यावर भाजपवर सडकून टीका केली (Balasaheb Thorat on Ram Mandir foundation program).

राम मंदिर उद्धव ठाकरेंच्या श्रद्धेचा विषय, कोरोना अपयश लपवण्यासाठी भाजपकडून पायाभरणीचा कार्यक्रम : थोरात
Follow us
| Updated on: Aug 04, 2020 | 5:13 PM

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राम मंदिर पायाभरणीच्या मुद्द्यावर भाजपवर सडकून टीका केली (Balasaheb Thorat on Ram Mandir foundation program). कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरुन इतरांचं दुर्लक्ष व्हावं म्हणूनच राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला जातोय, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. तसेच राम मंदिर हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या श्रद्धेचा विषय असल्याचं म्हणत सावध भूमिका घेतली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “श्रीराम हे दैवत आहेत. पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. आता माणसं जगवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरुन दुर्लक्ष करण्यासाठीच राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला जातोय.” यावेळी बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिर पायाभरणीसाठी जाण्याच्या शक्यतेवरही भाष्य केलं. राम मंदिर हा उद्धव ठाकरे यांच्या श्रद्धेचा विषय आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“भाजपला दुधाचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही”

बाळासाहेब थोरात यांनी महायुतीच्या दूध दरवाढीच्या आंदोलनावरही टीका केली. ते म्हणाले, “भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या काळात सलग 3 वर्षे दुधाचे दर कोसळले होते. सर्व शेतकरी 3 वर्ष आंदोलन करत होते, पण त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं होतं. शेवटी सरकार जाताना भाजप सरकारनं थोडी मदत केली. आमच्या सरकारने मागील 4 महिन्यांपासून दुधाच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. हर्षवर्धन पाटील यांनी आता भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसची काळजी सुरु केलेला टोला थोरात यांनी लगावला.

हेही वाचा :

शरद पवारांचं विधान मोदींविरोधी नव्हे तर श्रीरामांविरोधात, पवार तर रामद्रोही : उमा भारती

उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? संजय राऊत म्हणतात…

Balasaheb Thorat on Ram Mandir amid Corona Lockdown

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.