AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TRP Scam : BARC चा मोठा निर्णय, तीन महिने TRP चा खेळ बंद!

BARCच्या संचालक मंडळाकडून भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. | BARC TRP Scam

TRP Scam : BARC चा मोठा निर्णय, तीन महिने TRP चा खेळ बंद!
| Updated on: Oct 15, 2020 | 1:15 PM
Share

मुंबई: टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटस (TRP) घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (बीएआरसी) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी मूल्यमापनावर तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून स्वागत करण्यात आले आहे. (BARC to suspend measurement of TRP of news channels for a period of twelve weeks)

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. जाहिरातीच्यादृष्टीने जास्तीत जास्त टीआरपी पदरात पाडून घेण्यासाठी वाहिन्यांकडून सुरु असलेला हा गैरप्रकार समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे BARC सह संबंधित यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या.

या सगळ्या प्रकारानंतर BARCच्या संचालक मंडळाकडून भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल, याचा आढावा घेतला जाईल. देशातील सर्व भाषांतील वृत्तवाहिन्यांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठीच BARCकडून तीन महिने टीआरपीचे आकडे जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टीआरपी म्हणजे काय? टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

काय आहे टीआरपी घोटाळा? बीएआरसी BARC या संस्थेकडून टीआरपी मोजला जातो. यासाठी देशभरात जवळपास 30 हजार बॅरोमीटर्स लावण्यात आले आहेत. यापैकी दोन हजार बॅरोमीटर्स हे एकट्या मुंबईत आहेत. हे बॅरोमीटर्स कुठे लावलेत, याची माहिती गोपनीय असायची. हंसा या कंपनीला या बॅरोमीटर्सची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून टीआरपीमध्ये फेरफार करण्याचे रॅकेट चालवण्यात येत होते.

एखाद्या चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना दिवसभर आपल्या टीव्हीवर संबंधित चॅनेल सुरु ठेवण्यास सांगितले जाई. यासाठी लोकांना पैसे दिले जात असत. संबंधित चॅनेल सतत सुरु राहिल्याने त्याचा टीआरपी वाढण्यास मदत होत असे.

संबंधित बातम्या:

BARC Fake TRP Racket | अडाणी लोकांच्या घरातही इंग्रजी चॅनल, ‘रिपब्लिक’कडून TRP चा खेळ, दोन मालकांना अटक : मुंबई पोलीस

BARC Fake TRP Racket | टीआरपी घोटाळा, रिपब्लिक चॅनेलच्या वरिष्ठ पत्रकाराची चौकशी

(BARC to suspend measurement of TRP of news channels for a period of twelve weeks)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.