BARC Fake TRP Racket | ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा, बनावट टीआरपी प्रकरणी शिवसेना आक्रमक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही 'असत्यमेव जयते' म्हणत रिपब्लिक वाहिनीला टोला लगावला होता.

BARC Fake TRP Racket | 'रिपब्लिक' चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा, बनावट टीआरपी प्रकरणी शिवसेना आक्रमक
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 6:13 PM

मुंबई : पैसे वाटून बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या (Republic) अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक करा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन रॅकेटचा पर्दाफाश केला. (Shivsena MLA Pratap Sarnaik demands to arrest Arnab Goswami)

“सत्यमेव जयते! ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स टीव्ही’च्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्याकडे करतो.” असे ट्वीट प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

याआधी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘असत्यमेव जयते’ म्हणत रिपब्लिक वाहिनीला टोला लगावला होता.

(Shivsena MLA Pratap Sarnaik demands to arrest Arnab Goswami)

टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.

याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तर रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांची चौकशी करण्यात येईल.

काय आहे प्रकरण?

“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित बातम्या :

फेक टीआरपी म्हणजे काय? असा चालतो आकड्यांचा खेळ

अडाणी लोकांच्या घरातही इंग्रजी चॅनल, ‘रिपब्लिक’कडून TRP चा खेळ, दोन मालकांना अटक : मुंबई पोलीस

(Shivsena MLA Pratap Sarnaik demands to arrest Arnab Goswami)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.