AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dadar Best Bus Accident : दादर प्लाजा टॉकीजजवळ बेस्टच्या बसचा भीषण अपघात, 2 ठार, अनेक गाड्यांना धडक

Dadar Best Bus Accident : दादर प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यात काही जणांचे मृत्यू झाले असून काही जण जखमी झाले आहेत. दादरचा हा सर्वात वर्दळीचा भाग आहे.

Dadar Best Bus Accident : दादर प्लाजा टॉकीजजवळ बेस्टच्या बसचा भीषण अपघात, 2 ठार, अनेक गाड्यांना धडक
Best bus accident near dadar palaz
| Updated on: Jun 08, 2026 | 11:46 AM
Share

दादर प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. तीन ते चार गाड्यांना बेस्ट बसने धडक दिली. दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका दुचाकीच बरच नुकसान झाल्याची सुद्धा माहिती आहे. या अपघातामुळे प्लाझा दादर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. बेस्ट बसमधील 4 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बेस्ट बस धारावीकडून-दादरकडे येत होती. बसने सुरुवातीला नियंत्रण गमावल्यानं ट्रेलरला धडक दिली आणि अपघात झाला. बेस्ट बसचा ज्या ठिकाणी अपघात झाला, तो वर्दळीचा भाग आहे. दादरच्या प्लाझा टॉकीज आणि आसपासच्या परिसरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. भाजीवाले, व्यापारी, नोकरदार वर्ग यांच्या येण्या-जाण्याने हा भाग गजबजलेला असतो.

बेस्टची 463 क्रमांकाची बस प्लाझा सिनेमाजवळून जात असताना चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात झाला. बेस्ट बसने काही दुचाकींना सुद्धा धडकली. यात एक दुचाकी बसखाली आल्याचं बोललं जातय. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. बेस्ट बसने अनेक गाड्यांना सुद्धा धडक दिल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींचा आकडा 4 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

किती वाजता झाला अपघात?

प्लाझा सिनेमाजवळ कोतवाल गार्डने आहे, तिथे हा अपघात झाला. सकाळी 9.30 च्या सुमारास हा अपघात झाला. इलेक्ट्रिकवर चालणारी ही बस असल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट बसचा असा अपघात होण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा मुंबईत वदर्ळीच्या रस्त्यावर अशा प्रकारे बेस्ट बसचे अपघात झाले आहेत. त्यात अनेक निष्पापांनी आपले प्राण गमावले आहेत. या अपघातामुळे चालकाची मानसिक स्थिती आणि प्रशिक्षणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. रिषभ गुप्ता, सतीश वाघांब्रे, महेश डोईफोडे अशी तीन जखमींची नावं आहेत.

आतापर्यंत झालेले बेस्ट बसचे अपघात

जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत BEST बसचे 958 अपघात झाले. त्यामध्ये 77 जणांचा मृत्यू आणि 217 जण जखमी झाले.

यापैकी 85% पेक्षा जास्त अपघात सुमारे 815 अपघात हे वेट-लीज अर्थात भाडेतत्त्वावरील बसशी संबंधित होते.

फक्त 2025 मध्ये 606 मोठे आणि किरकोळ अपघात नोंदवले गेले असून त्यापैकी 582 अपघात वेट-लीज बसांचे होते.

2024-25 आर्थिक वर्षात झालेल्या 12 प्राणघातक अपघातांपैकी 10 अपघात वेट-लीज इलेक्ट्रिक बसांचे होते.

2025-26 मध्ये बेस्ट बस अपघातांमधील 24 मृत्यूंपैकी 88% मृत्यू वेट-लीज बसशी संबंधित आहेत.

Follow Us
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
Ashok Gehlot | काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी; अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट!
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!