AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेस्टमध्ये महापालिका निवडणुकीची ट्रायल? ठाकरे बंधूंना तगडी टक्कर देण्यासाठी फडणवीसांचे दोन शिलेदार मैदानात, कोण मारणार बाजी?

बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचे 'उत्कर्ष पॅनल' आणि भाजपचे 'सहकार समृद्धी पॅनल' आमनेसामने आहेत. १८ ऑगस्टला होणाऱ्या या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा भाजपकडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी सामना केला आहे

बेस्टमध्ये महापालिका निवडणुकीची ट्रायल? ठाकरे बंधूंना तगडी टक्कर देण्यासाठी फडणवीसांचे दोन शिलेदार मैदानात, कोण मारणार बाजी?
Fadnavis Uddhav and Raj Thackeray
| Updated on: Aug 15, 2025 | 1:25 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सातत्याने पाहायला मिळतात. आगामी मुंबई महापालिका निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन लढेल, अशी चर्चा सुरु असतानाच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेची युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाच्या कामगार सेना उत्कर्ष पॅनल हे एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत. आता ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी खेळी केली आहे.

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल ठरलं आहे. ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दोन शिलेदार मैदानात उतरणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपचं सहकार समृद्धी पॅनल हे निवडणूक लढणार आहे. भाजपकडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे बेस्ट पतपेढी निवडणूक ही अटीतटीची ठरणार असल्याचे बोललं जात आहे.

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. ठाकरे बंधूंनी ‘उत्कर्ष पॅनेल’ अंतर्गत बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी युती केली आहे. बेस्टच्या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाच्या कामगार सेना उत्कर्ष पॅनल म्हणून ही निवडणूक एकत्रित लढणार आहेत.

उत्कर्ष पॅनेलच्या उमेदवारांची नावं

सर्वसाधारण प्रवर्ग : सारंग उमेश श्रीधर,कोंडे प्रशांत वसंत, वारिसे रविंद्र राजाराम, इंदप मधुकर दिनकर, राजगुरू अशोक शंकर, टुकरूल महेश मोहन, माळी स्वामी हणमंत,पवार जितेंद्र दत्तात्रय,हरयाण अविनाश सुरेश,लोखंडे सुकुमार विष्णू, तळपाडे किसन मारूती,सुर्वे शिवाजी रामचंद्र, गोरे राजेश काशिनाथ, मांढरे निलेश प्रकाश, संगम काशिनाथ बलराम,राऊत नरेंद्र दत्तात्रय

महिला राखीव – बबीता अजित पवार, सिमा गिरीश मानकामे

ओबीसी प्रवर्ग –  रेडीज नितीन मनोहर

एससीएसटी प्रवर्ग –  मोहिते शैलेश जयराम

व्हीजेएनटी –  बंडगर महादेव सोपान

महापालिकेत युती होणार का?

दरम्यान शिवसेना आणि मनसे बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विविध बैठका घेऊन कामाला लागण्याचे आदेश देत आहेत. तसेच युती संदर्भातील निर्णय पक्षाच्या पातळीवर होईल, असेही दोन्ही बंधूंनी सांगितले आहे. त्यामुळं आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.