साकीनाका बलात्कार प्रकरणात अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या, भीम आर्मीची मागणी

साकीनाका येथील पिडीत प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा तसेच कुटुंबीयांना शासनाने आर्थिक सहाय्य करण्यासह शासनाची सदनिका द्यावी, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणात अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या, भीम आर्मीची मागणी
BHIM ARMY PROTEST
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 12:03 AM

मुंबई : साकीनाका येथील बलात्कार प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा तसेच कुटुंबीयांना शासनाने आर्थिक सहाय्य करण्यासह सदनिका द्यावी, अशी मागणी भीम आर्मीने केली. या तसेच इतर मागण्यांना घेऊन भीम आर्मी तसेच भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने आज (12 सप्टेंबर) साकीनाका पोलीस ठाणे येथे जोरदार निदर्शने केली. (bheem army demands that case have to be register under atrocity act in case of sakinaka rape case)

पोलिसांनी घाईने अत्यंस्कार केल्याचा आरोप

यावेळी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील थोरात, रमेश बालेश तसेच संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलकांनी साकीनाका पोलीस ठाण्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागण्यांचे नवेदन दिले. तसेच पोलिसांनी पीडीतेच्या कुटुंबियांना घेऊन कालच घाईघाईने अंत्यसंस्कार उरकल्याचा आरोपही केला.

अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा

महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेला शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा. साकीनाका प्रकरणातील इतर आरोपींचा शोध लवकरात लवकर घ्यावा. तसेच सर्व आरोपींविरोधात 307, 376 भादंवि कलमांसह 302 व अॅट्राॅसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा. साकीनाका पिडीतेच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे त्यांच्या संगोपनाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. तसेच विशेष बाब म्हणून रूपये 50 लाखाचे आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी भीम आर्मीने केली.

संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी

तसेच पिडीतेच्या कुटुंबीयांना शासनाने एक सदनिका द्यावी. गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यास दिरंगाई करावी व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल न करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी. अमरावती व पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी अशा मागण्या भीम आर्मीने आपल्या निवेदनात केल्या.

साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्याचा झाल्यानंतर वातवरण चांगलेच चिघळले आहे. या प्रकरणातील दोषी आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फेदेखील अंधेरी साकिनाका येथील सिग्नल जवळ जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी राज्य मंत्री अविनाश महातेकर, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.

इतर बातम्या :

कोरोनावरील उपचारांसाठी केंद्र सरकारकडून तरुणांना 4000 रुपयांची मदत, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

धक्कादायक ! लहान भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद, 16 वर्षीय मुलीने घेतलं उंदीर मारण्याचं औषध

नेमकं असं काय घडलं ज्याने बँक ऑफ बडोद्याच्या महिला मॅनेजरला गळफास घ्यावा लागला, पतीला बेड्या, हत्या की आत्महत्या?

(bheem army demands that case have to be register under atrocity act in case of sakinaka rape case)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.