भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही नजरकैदेत

मुंबई: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. मालाड इथल्या मनाली हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आझाद यांच्या राज्यातील होणाऱ्या सभा आणि कार्यक्रम होऊ नये याची पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केल्याचा आरोप भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान,  चंद्रशेखर आझाद यांना चैत्यभूमीवर […]

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही नजरकैदेत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. मालाड इथल्या मनाली हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आझाद यांच्या राज्यातील होणाऱ्या सभा आणि कार्यक्रम होऊ नये याची पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केल्याचा आरोप भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान,  चंद्रशेखर आझाद यांना चैत्यभूमीवर पोहोचण्यापूर्वीच काल अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. आझाद यांना पोलिसांनी कुठे नेलंय याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नव्हती. मात्र आझाद हे हॉटेल मनालीमध्येच नजरकैदेत आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या गाडीतून चंद्रशेखर आझाद यांनी फेसबुक लाईव्ह केलं. हे महाराष्ट्राचे पोलीस प्रशासन बघा आम्हाला कसं अटक केलं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला झुकायला शिकवलं नाही, असं वक्तव्य चंद्रशेखर आझाद यांनी फेसबुक लाईव्हमध्ये केलं. पण पोलिसांनी हे फेसबुक लाईव्ह मध्येच बंद केलं.

दिवसभर नजरकैदेत

चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदाच मुंबई आणि महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मात्र वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवलं. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं विजय दिवस साजरा केला जाणार आहे. भीमा कोरेगाव संघर्ष महासभेत चंद्रशेखर आझाद हे भाषण देणार आहेत. मात्र गेल्या वर्षी झालेला हिंसाचार लक्षात घेता, पोलिसांनी प्रचंड खबरदारी घेतली आहे. वाचाभीमा कोरेगावला भीम आर्मी आणि ब्राह्मण महासंघ आमनेसामने?

कोण आहेत चंद्रशेखर आझाद? – चंद्रशेखर आझाद हे नाव उत्तर प्रदेशातील जातीय हिंसाचारानंतर सर्वांसमोर आलं. – या दंगलीनंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली. – देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख आहे – सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून काही दिवसांपूर्वीच सुटका झाली. – देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख बनली.

भीम आर्मी चंद्रशेखर आझाद यांनी तीन वर्षापूर्वी भीम आर्मी या संघटनेची स्थापना केली आहे. बहुजन समाजासाठी भीम आर्मी संघटनेची स्थापना केल्याचं आझाद यांचं म्हणणं आहे.दलित, बहुजन समाजाच्या सुरक्षेसाठी आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही संघटना काम करत असल्याचं आझाद यांनी सांगितलं.

चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्र दौरा

29 डिसेंबर : मुंबईतील दादर चैत्यभूमी इथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार, संध्याकाळी 4 वाजता वरळीतील जांबोरी मैदान येथील महाराष्ट्र भीम आर्मी आयोजित पहिल्या आंबेडकरी जनचेतना सभेला मार्गदर्शन 30 डिसेंबर : पुण्यातील एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन 31 डिसेंबर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद आंबेडकरी तरुणाईशी या कार्यक्रमाचे आयोजन 1 जानेवारी 2019 – भीमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभास अभिवादन करुन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विजय स्तंभावर पुष्पवृष्टीचं नियोजन 2 जानेवारी 2019 – लातूरमध्ये जाहीर सभा 4 जानेवारी 2019 – अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर जाहीर सभा

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.