AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतून मोठी बातमी! भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आगीच्या भीषण ज्वाळा पहायला मिळत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतून मोठी बातमी! भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग
Byculla Police Station FireImage Credit source: Google
| Updated on: Jul 26, 2026 | 9:18 PM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आगीच्या भीषण ज्वाळा पहायला मिळत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीची माहिती समोर येताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

भायखळा पोलिस स्टेशनला लागली आग

भायखळा पोलिस स्टेशनला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग लागल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू असून अधिक तपास केला जात आहे.

कल्याणमध्ये दुचाकीला आग

कल्याण पश्चिमेतील कोळीवली पेट्रोल पंपाजवळ चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून तातडीने उडी मारली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण दुचाकीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

भिवंडीत टेम्पोला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील वडपे वंजारपट्टी नाका रस्त्यावरील निंबवली फाटाजवळ उभ्या असलेल्या टेम्पोला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. नाशिकहून भिवंडीतील पोगाव येथील ॲमेझॉन गोदामात किराणा साहित्य घेऊन येणाऱ्या टेम्पोला ही भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक सद्दाम हुसेन हा रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून चहा पिण्या साठी उतरला असता ही घटना घडली आहे. स्थानिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. संपूर्ण टेम्पो आगीत जळून खाक झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार