सचिन तेंडुलकरसाठी समर्थकांची बॅटिंग; गिरगावातही भाजपकडून लतादीदींच्या समर्थनाचा सूर

भाजपकडून बुधवारी सचिन तेंडुलकर याच्या समर्थनार्थ त्याच्या वांद्रे येथील घरासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक माजी क्रिकेटपटुंचाही समावेश आहे. | Sachin Tendulkar Lata Mangeshkar BJP

सचिन तेंडुलकरसाठी समर्थकांची बॅटिंग; गिरगावातही भाजपकडून लतादीदींच्या समर्थनाचा सूर
लता मंगेशकर यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, भाजप पक्ष त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला आहे. मुंबईतील

मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत परदेशी सेलिब्रिटींच्या हस्तक्षेपाला विरोध करणारा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या समर्थनार्थ आता त्याचे समर्थक मैदानात उतरला आहे. भाजपकडून बुधवारी सचिन तेंडुलकर याच्या समर्थनार्थ त्याच्या वांद्रे येथील घरासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक माजी क्रिकेटपटुंचाही समावेश आहे. (BJP supports Sachin Tendulkar and Lata Mangeshkar)

यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणबाजी करण्यात आली. ‘भारतरत्न का अपमान नही सहेगा हिंदुस्तान’, ‘जो लतादीदी के साथ व देश के साथ’, असे नारे देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांनी सचिन तेंडुलकरच्या घराच्या परिसरात जाण्यास मज्जाव केला. त्यासाठी याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गिरगावात भाजपकडून लतादीदींच्या समर्थनाचा सूर

लता मंगेशकर यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, भाजप पक्ष त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला आहे. मुंबईतील गिरगाव येथे देवधर चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत लता मंगेशकर यांच्या कृतीचे समर्थन केले.

“सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?” स्वाभिमानीचं सचिनच्या घराबाहेर आंदोलन

दोन दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांची सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्याला प्रश्न विचारला आहे. आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिनला विचारण्यात आला.

शरद पवार सचिनच्या ट्विटवर काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, “सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे.”

सचिन तेंडुलकर नेमकं काय म्हणाला?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं ट्विट द्वारे (Sachin Tendulkar) प्रत्युत्तर दिलं होतं.भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.

संबंधित बातम्या:

सचिनला माझा ‘हा’ सल्ला, शेतकरी आंदोलानावरुन शरद पवारांनी सचिनचे कान टोचले

सचिनने कधी नाही ते शेतकरी आंदोलनावर ट्विट करून चूक केली? पवारांसह अनेकजण का नाराज

(BJP supports Sachin Tendulkar and Lata Mangeshkar)

Published On - 4:44 pm, Wed, 10 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI