सचिनने कधी नाही ते शेतकरी आंदोलनावर ट्विट करून चूक केली? पवारांसह अनेकजण का नाराज?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावरून ट्विट केल्यानंतर त्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (why netizens unhappy and criticised to sachin tendulkar tweet?)

सचिनने कधी नाही ते शेतकरी आंदोलनावर ट्विट करून चूक केली? पवारांसह अनेकजण का नाराज?
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 8:32 AM

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावरून ट्विट केल्यानंतर त्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही संघटनांनी तर सचिनला दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या क्षेत्राबाहेरच्या विषयावर जपून बोलण्याचा सल्ला सचिनला दिला आहे. सचिनच्या एका ट्विटनंतर पवारांपासून ते अनेकजण सचिनवर नाराज का आहेत? त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? याचा घेतलेला हा आढावा. (why netizens unhappy and criticised to sachin tendulkar tweet?)

सचिन काय म्हणाला होता?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिलं होतं. ‘भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे’, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले. याच ट्विटवरुन अनेक क्रीडारसिकांच्या रोषाला सचिनला सामोरे जावे लागले.

पवारांची नाराजी आणि सल्ला

सचिनच्या या ट्विटरवरून शरद पवारही नाराज झाले होते. सचिनवर सर्वस्तरातून टीका होत असल्याने पवारांनी सचिनला सल्लाही दिला. सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे, असं पवार म्हणाले होते.

भारतरत्न रिहालाना उत्तरे का देत आहेत?; राज यांचा सवाल

राज ठाकरे यांनीही या वादातून उडी घेऊन भारतरत्नांना काही सवाल केले आहे. रिहाना कोण आहे? कुठून आलीय? भारतरत्न त्यांना का उत्तरे देत आहेत? यापूर्वी रिहानाला कोणीच ओळखत नव्हतं. आता सर्वच ओळखत आहेत. या रिहानाबाईला एवढं महत्त्व देण्याची गरज नव्हती, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

अर्जुनच्या भविष्यासाठी खटाटोप?; चोरमारेंची टीका

अर्जुनच्या भविष्याचा विचार करून आणि जय शाहकडे बघून सचिन तेंडुलकरने व्यावहारिक पाऊल उचलले असावे. आपण सहानुभूती व्यक्त करुया, अशी खोचक टीका ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केली आहे. सचिन तेंडुलकरपासून अजय देवगणपर्यंत ७१ दिवस झोपलेल्या भारतातल्या तमाम सेलिब्रिटींनी धक्का देऊन खिळ्यांच्या भिंतीपालिकडे ढकलून दिल्याबद्दल रिहाना ला मनःपूर्वक धन्यवाद, असंही चोरमारे यांनी म्हटलं आहे.

कोण काय म्हणाले?

प्रिय सचिन, तू क्रिकेटमधला देव आहेस. म्हणून तुला बाकीच्या विषयातलं कळतं, असं कधीच नव्हतं. बाकी आम्ही तर खऱ्या देवालाही सोडत नाही. तू मस्त माणूस आहेस. तुझं देशावर प्रेम आहे. म्हणून तुला राजकारण कळतं, देशकारण कळतं, असं थोडंच आहे. तू सत्यसाईबाबाचा भक्त होतासच. तरीही तुझ्या खेळाने माझ्या पिढीला प्रेरणा दिली. म्हणून काही आम्ही सत्यसाईबाबाच्या मागे गेलो नाही. म्हटलं तुझी यातली समज इतकीच. आणि आता हा नवा सत्यसाईबाबा. याच्याकडे तर नावापुरतंही सत्य नाही, असं ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी म्हटलं आहे.

प्रिय सचिन,

तू क्रिकेटमधला देव आहेस. म्हणून तुला बाकीच्या विषयातलं कळतं, असं कधीच नव्हतं. बाकी आम्ही तर खऱ्या देवालाही…

Posted by Sachin Parab on Wednesday, February 3, 2021

तर, रिहानाच्या ट्विट ला उत्तर द्यायला आज कोण कोण सरसावलं? अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी, करण जोहर.. अजून कोणी राहिला असेल तर सांगा. प्रत्येक व्यवस्थेत आपली माणसं कशी पाळली आहेत याचा यानिमित्ताने पर्दाफाश.. बाय द वे ते ‘T-3804’ आलं का काही?, असं प्रशांत कदम यांनी म्हटलं आहे. (why netizens unhappy and criticised to sachin tendulkar tweet?)

‘अब की बार ट्रम्प सरकार’ बोलताना Internal matter नव्हतं का?? असा सवाल पत्रकार रश्मी पुराणिक यांनी केला आहे. दुसऱ्यांच्या देशात जाऊन कुणाला मतदान करा हे सांगितल्यावर त्या देशातील सेलिब्रिटींनी म्हटलं का आमच्या देशात नाक खुपसू नका.. आता तुम्ही कोणत्या न्यायाने त्यांना सांगता बोलू नका?, असा सवालही त्यांनी केला आहे. (why netizens unhappy and criticised to sachin tendulkar tweet?)

संबंधित बातम्या:

देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त, दिल्ल्लीच्या दिव्याखाली अंधार; संजय राऊतांचा घणाघात

Special Story: ओबीसींची जनगणना भारतीय राजकारणाची कूस बदलणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

शेतकरी आंदोलन : इंटरनेट बंदीचा मुद्दा गेला सर्वोच्च न्यायालयात

(why netizens unhappy and criticised to sachin tendulkar tweet?)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.