“ठाकरे डिमांड रुपया, TDR त्यांना मिळाला की ‘यु टर्न’ घेण्यास मोकळे”, आशिष शेलारांची खोचक टीका

"एकदा 'ठाकरे डिमांड रुपया' (TDR) त्यांना मिळाला की 'यु टर्न' घेण्याचा मार्ग मोकळा. आज म्हणाले त्यांनी घेतलेला बिल्डर धार्जिणा एक निर्णय दाखवा. बघा घेतला का यु टर्न? कोविडमध्ये बिल्डरांना 12 हजार कोटींचा प्रिमियम कुणी माफ केला?" असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

ठाकरे डिमांड रुपया, TDR  त्यांना मिळाला की 'यु टर्न' घेण्यास मोकळे, आशिष शेलारांची खोचक टीका
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 7:04 PM

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : धारावी पुनर्विकास प्रकल्पात त्रुटी असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज धारावी ते बीकेसी असा मोर्चा काढला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम राज्य सरकारकडून उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समूहाला देण्यात आलं आहे. पण त्यावरुन उद्धव ठाकरेंनी टीका केलीय. तसेच धारावीकरांना 500 चौरस फुटाची घरे मिळावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. उद्धव ठाकरेंनी याबाबतची मागणी करत आज धारावी ते अदानी उद्योग समूहाचं कार्यालय असलेल्या बीकेसीपर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजप, आणि अदानींवर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या टीकेला आता भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. “उद्धव ठाकरे यांना अदानींकडून पैसा मिळाला की ते थेट यु टर्न घेतील”, असा धक्कादायक आरोप शेलारांनी केलाय.

“एकदा ‘ठाकरे डिमांड रुपया’ (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्याचा मार्ग मोकळा”, अशा शब्दांत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका केली आहे. “ठाकरे गट नेहमीच विकासाच्या विरोधात काम करते. प्रकल्प अडवून कटकमिशन वसूली करणारे मुंबईकरांसाठी नाही तर कटकमिशनसाठी संघर्ष करीत आहेत. यांच्या सरकारच्या काळातच धारावीच्या पुनर्विकासाचा टेंडर निघाले”, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

‘उद्धव ठाकरे (UT) म्हणजे यु टर्न’, शेलारांची टीका

“उद्धव ठाकरे (UT) म्हणजे यु टर्न… आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यातून प्रत्येकवेळी यु टर्न घेतले आहेत. आता त्यांनी धारावी पुनर्विकासाला विरोध करणारी भूमिका घेतली आहे. “यु टर्न फेम” श्रीमान उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तोही “टि जंक्शन” वरूनच. म्हणजे कुठल्याही बाजूला वळायची सोय आहेच”, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंच्या खोक्यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर

“एकदा ‘ठाकरे डिमांड रुपया’ (TDR) त्यांना मिळाला की ‘यु टर्न’ घेण्याचा मार्ग मोकळा. आज म्हणाले त्यांनी घेतलेला बिल्डर धार्जिणा एक निर्णय दाखवा. बघा घेतला का यु टर्न? कोविडमध्ये बिल्डरांना 12 हजार कोटींचा प्रिमियम कुणी माफ केला?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला. यावेळी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या खोक्यांच्या आरोपांवरुन निशाणा साधला. “धारावीकरांचा यांना पुळका जोरात, खोके घेऊन अदानी कधी जाणार आता मातोश्रीच्या दारात?”, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.