‘खून, बलात्कार होतातच, गुंड जेलमधून सुटल्यावर मिरवणूक काढतात, सरकार अस्तित्वहीन झालंय’

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर तो मंगळवारी तळोजा कारागृहातून बाहेर आला होता. | Chitra wagh

'खून, बलात्कार होतातच, गुंड जेलमधून सुटल्यावर मिरवणूक काढतात, सरकार अस्तित्वहीन झालंय'
चित्रा वाघ, भाजप नेत्या

मुंबई: महाविकासआघाडी सरकारच्या काळात खून किंवा बलात्कार ही एखाद्या सामान्य घटनेसारखी बाब झाली आहे. पण आता तुरुंगातून सुटल्यावर नामचीन गुंड मिरवणूक (Gaja marne) काढायची हिंमत करु लागले आहेत. हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. (Chitra wagh slams Mahaviaks Aghadi govt)

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर तो मंगळवारी तळोजा कारागृहातून बाहेर आला होता. यानंतर गजानन मारणे समर्थकांनी त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढली होती. याच मुद्द्यावरुन चित्रा वाघ यांनी ट्विट करुन राज्य सरकारला धारेवार धरले. तुरुंगातून सुटल्यावर एखादा नामचीन गुंड मिरवणूक काढायची हिंमत करतो. कोणीही गुंड खुलेआम दणक्यात वाढदिवस साजरा करतो. हे चांगल्या समाजासाठी लाजीरवाणं आहेच. पण हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचाही पुरावा आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

काय आहे प्रकरण?

कुख्यात गुंड गजानन मारणे सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून बाहेर आला. त्यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने त्याचे समर्थक जमले होते. गजानन मारणे याच्या सुटकेनंतर त्याच्या पिलावळीने एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केले. पिंपरी – चिंचवडच्या हद्दीतून सायंकाळी पुण्याच्या दिशेने मारणे आणि त्याच्या समर्थकांचा ताफा गेला. या ताफ्यात जवळपास 300 गाड्या होत्या. यापैकी एकाही गाडीने टोल भरला नाही.

गजानन मारणे याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून प्रचंड दंगा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.

शरद मोहोळला अटक

कुख्यात गुंड शरद मोहोळला (Goon Sharad Mohol) पुन्हा अटक करण्यात आली आहे. मोहोळ अवघ्या 15 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. 26 जानेवारील शरद मोहोळने हजेरी लावलेल्या कार्यक्रमात धांगडधिंगा केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील खडक पोलिसांनी मोहोळला बेड्या ठोकल्या. (Pune Goon Sharad Mohol arrested after

शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये नाडीने गळा आवळून सिद्दीकीचा खून केल्याचा मोहोळवर आरोप आहे.

शरद मोहोळविरोधात कलम 143, 188, 37 (3) अंतर्गत फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम, 51 बी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शरद मोहोळ 26 जानेवारीला ज्या कार्यक्रमाला हजर राहिला होता, त्यावरुन खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहोळ याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

गजानन मारणेपाठोपाठ आता शरद मोहोळविरोधातही गुन्हा दाखल

धांगडधिंगा भोवला! कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांकडून अटक

(Chitra wagh slams Mahaviaks Aghadi govt)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI