Kirit Somaiya | हनुमान चालिसा म्हणणाऱ्या भक्तावर राजद्रोह, जेलमधून थेट हॉस्पिटलमध्ये, माफिया सरकारचा निषेध.. किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

जेलमधून नवनीत राणा यांना थेट हॉस्पीटलमध्ये जावं लागलंय. या माफिया सरकारमधून राज्याची सुटका कर, अशी प्रार्थना किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.

Kirit Somaiya | हनुमान चालिसा म्हणणाऱ्या भक्तावर राजद्रोह, जेलमधून थेट हॉस्पिटलमध्ये, माफिया सरकारचा निषेध.. किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 05, 2022 | 3:20 PM

मुंबईः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना हनुमान चालिसा म्हणल्यामुळे जेलमध्ये टाकणाऱ्या माफिया सरकारचा मी निषेध करतो. राजद्रोहाच्या आरोपाखाली 11 दिवस जेलमध्ये टाकल्यानंतर नवनीत राणा यांना थेट हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे, त्यांची प्रकृती ढासळली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या बेशरमीची आणि बेरहमीची हद्द आहे, असा आरोप बाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. खासदार नवनीत राणा यांची आज भायखळा जेलमधून सुटका झाली. मुंबई सत्र न्यायालयाने काल नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांचाही जामीन मंजूर केला. त्यानंतर या दोघांचीही आज सुटका होत आहे. त्यानुसार, नवनीत राणा यांना भायखळा जेलमधून सोडण्यात आलं, मात्र त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे पोलिसांनी नवनीत राणा यांना थेट लिलावती रुग्णालयात नेलं. अटक झाली त्या दिवशी नवनीत राणा या अत्यंत आक्रमक होत्या. आज 11 दिवसानी जेलमधून सुटल्यावंतर त्या अशक्त दिसत होत्या. छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती.

किरीट सोमय्या राणांच्या भेटीला

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यादिवशीदेखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेत नवनीत राणा यांना जेलमध्ये वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला होता. आज नवनीत राणा यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं ,तेव्हा किरीट सोमय्या हे आज त्यांच्या भेटीला रुग्णालयात पोहोचले. दरम्यान नवनीत राणा यांच्या आज सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्येच राहतील का त्यांना घरी पाठवलं जाईल हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.

‘माफिया सरकारमधून सुटका कर’

नवनीत राणा यांच्या भेटीसाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले. हनुमान चालिसा म्हणल्यानंतर राजद्रोहाच्या आरोपाखाली 11 दिवस जेलमध्ये ठेवणाऱ्या माफिया सरकारची मला लाज वाटते. ही बेशरमीची हद्द आहे. जेलमधून नवनीत राणा यांना थेट हॉस्पीटलमध्ये जावं लागलंय. या माफिया सरकारमधून राज्याची सुटका कर, अशी प्रार्थना किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें