मोठी बातमी: प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात ऑडिट होणार

प्रवीण दरेकर (Pravin Darkear) यांच्यावर आरोप असलेल्या मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणाची (Mumbai Bank) आता खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. | Mumbai Bank Audit

मोठी बातमी: प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात ऑडिट होणार
pravin darekar
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 10:58 AM

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरुन महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवण्यात आघाडीवर असलेले भाजप आमदार प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर (Pravin Darkear) यांच्यावर आरोप असलेल्या मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणाची (Mumbai Bank) आता खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने मुंबै बँकेतील विविध शाखांचे सविस्तर लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Mahavikas Aghadi govt orders audit of Mumbai bank)

प्राथमिक माहितीनुसार, नाबार्डने यासंदर्भात दिलेल्या अहवालानंतर सहकार विभागाने सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 16 फेब्रुवारीला हा अहवाल सुपूर्द करण्यात आला होता. यामध्ये मुंबै बँकेच्या विविध शाखांमध्ये भाडे करार, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि फर्निचर खरेदीच्या व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता या सर्व शाखांचे ऑडिट होईल. त्यामधून आता काय समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप आमदाराचं वीजपंप घेऊन विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन

वाढीव वीजबिल आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाजपने विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केलं आहे. भाजप आमदार राम सातपुते तर थेट विधानभवनात कृषी पंप घेऊन आले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असतानाच त्यांनी वाढीव वीजबिल फाडून सरकारचा निषेध नोंदवला. सरकारने वीज कनेक्शन तोडणी न थांबविल्यास कृषीपंपच सरकारच्या डोक्यात हाणू, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यावर जमले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

‘ये तो सिर्फ झांकी है’

यावेळी दरेकर यांनीही वीजबिलावरून राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार लुटारू आहे. शेतकऱ्यांची लूट करत आहेत. आता केवळ आम्ही विधानभवनाच्या पायरीवर बसून आंदोलन करत आहोत. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है, असं सांगत दरेकर यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्याचा इशाराच दिला.

संबंधित बातम्या:

आम्ही चौकशीला घाबरत नाही, प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान

(Mahavikas Aghadi govt orders audit of Mumbai bank)

Non Stop LIVE Update
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.