AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विधानसभेत पाडलं, दूध डेअरीतून, बँकेतून हाकललं’, गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांच्यावर तिखट शब्दांत प्रहार

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर अतिशय तिखट शब्दांमध्ये प्रहार केलाय. त्यामुळे आता खडसे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाजन यांनी खडसे यांना काही तिखट सवालही केले आहेत.

'विधानसभेत पाडलं, दूध डेअरीतून, बँकेतून हाकललं', गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांच्यावर तिखट शब्दांत प्रहार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 05, 2023 | 8:26 PM
Share

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात नेहमी वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं. आतादेखील गिरीश महाजन यांनी खडसेंच्या टीकेवर अतिशय खोचक शब्दांत प्रहार केलाय. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. सत्ताधाऱ्यांना मस्ती आलेली आहे, ती जिरवावी लागेल, अशी टीका खडसेंनी केली होती. याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंवर प्रचंड तिखट शब्दांमध्ये प्रहार केला.

“खडसे साहेब आमची मस्ती काढत आहात, तुमची मस्ती जिरली नाही का? तुम्ही काय होता, आता कुठे जाऊन बसलेले आहात? दहा-दहा मंत्रिपदं घेताना तुम्हाला काही वाटलं नाही का?”, असे सवाल गिरीश महाजन यांनी केला. “तुमची मस्ती लोकांना बघितली आहे. साऱ्या बिल्डरने बघितली आहे. आता तुम्ही त्याचे फळ भोगत आहात. तुम्ही 30 ते 35 वर्ष भाजपात होता. सर्वात जास्त पदे तुम्ही भोगली”, असं गिरीश महाजन खडसेंना उद्देशून म्हणाले.

‘तुम्हाला दूध डेअरीतून, बँकेतून हाकललं’

“सर्वात जास्त लाल दिव्याच्या गाड्या 15 ते 20 वर्ष सत्ता नसताना विरोधी पक्ष म्हणून भोगल्या आहेत. आता दोन वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली आहे का? तुम्हाला लोकांनी विधानसभेत पाडलं. दूध डेअरीतून हकललं, बँकेतून हाकललं. तुमचं काय राहिलं? आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत. देवेंद्र फडणवीस बरोबर आहेत. पण तुमचं काय झालं? तुमचे हाल कोण खात आहे आज? हे जरा बघा”, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी खडसेंना सुनावलं.

‘मनाचा मोठेपणा लागतो’

देवेंद्र फडणवीस यांना माफी मागायची सवय लावावी लागेल, असं वक्तव्य खडसेंनी केलंय. त्यांच्या वक्तव्याबाबतही पत्रकारांनी गिरीश महाजन यांना विचारलं. “हे बघा मनाचा मोठेपणा लागतो. पोलिसांनी जे केलं त्याचं समर्थन कोणी करणार नाही. तुम्हालाही माहिती आहे. ऐनवेळी तिथली परिस्थिती पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला असेल. पण देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या, मंत्रालयातून सूचना दिल्या हे म्हणणं चुकीचं आहे”, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

“देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने माफी मागितली. पोलिसांकडून चूक झाली आहे. माफ करा. माफी मागायलाही मोठं मन लागतं. यालाही मोठंपण लागतं. मग यावरुन त्यांनी राजीनामा द्यावा, असं म्हणणं चुकीचं आहे”, असं महाजन म्हणाले.

‘आमचं सरकार मराठा समाजाला न्याय देईल’

“एका ओळीचा अध्यादेश काढून चालत नाही. हा विषय अध्यादेश काढण्यासारखा किंवा कॅबिनेट बैठकीत निर्णय घेता येईल, असा नाहीय. आपण किती वर्ष लढतोय, किती वर्षांपासून मागणी होतेय. आमचं सरकार असताना चार वर्ष किती सर्कस करावी लागली आणि तरीही हे आरक्षण टिकवलं होतं. सेशन कोर्ट, हायकोर्टात टिकवलं. पण उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा दुर्लक्ष झालं आणि आरक्षण टिकलं नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. आमचं सरकारच मराठा समाजाला न्याय देईल”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल