AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटीचा ठेका कुणासाठी? राणेंचं महापौरांना पत्र

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहिलं आहे. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटींचा ठेका कुणासाठी?, असा सवाल त्यांनी महापौरांना पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.

वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटीचा ठेका कुणासाठी? राणेंचं महापौरांना पत्र
किशोरी पेडणेकर, महापौर,मुंबई
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 9:22 AM
Share

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्र लिहिलं आहे. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटींचा ठेका कुणासाठी?, असा सवाल त्यांनी महापौरांना पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.

नितेश राणे यांचं महापौर पेडणेकरांना लिहिलेलं पत्र जशास तसं…

“आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केलीये, हे अत्यंत निंदनीय आहे”

“असो, आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्वीन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला, महापालिकेने प्रकाशीत केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात १७ लाख ५७ हजार ०५९ होती पण मागील दोन वर्षांमध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला, आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आलीय. त्यामुळे तीन वर्षांत सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे.”

“मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये २०१० पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हे ५ रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण ५ रूपयांवरून थेट ५० रूपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदींसाठी १०० रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला ५० रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्यानी नाही.”

“एवढंच नाही तर शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचे आपण सांगितलंत पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतःकरु शकतात तर पेंग्वीनची का नाही ? हा पंधरा कोटीचा पेंग्वीन देखभालीचा ठेका कोणासाठी?”

“राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका ‘पेंग्वीन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले.”

“इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे मुलांसाठीट खुले केले गेले नाहीत मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय? हे तरी सांगा”

(BJP Mla Nitesh Rane Wrote A letter To mumbai mayor Kishori Pednekar)

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंचा जगनमोहन रेड्डींना फोन, तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

OBC Reservation Issue | सरकारच्या अध्यादेशावर पंकजा मुंडेंना साशंकता? सरकार खात्री देणार का? पंकजांचा सवाल

सरकारचा अध्यादेश आगामी पोटनिवडणुकीला लागू होणार नाही? पंकजा मुंडेंनंतर नरकेंचही मोठं वक्तव्य

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.