मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का? भाजपचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का? भाजपचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 3:01 PM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अद्यापही चिंताजनकच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज आपण मुंबई, पुण्यातील रुग्णसंख्येबाबत बोलत आहोत. मात्र कोकणातील परिस्थितीचे काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का? असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे. (BJP MLA Prasad Lad criticize CM Uddhav Thackeray On Konkan Corona patient)

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती चिंताजनक

कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले? पण या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोकणाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती आज चिंताजनक आहे. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 15,166 रुग्ण बाधित झाले. त्यातील 11,000 रुग्ण बरे झाले आहेत. आज सिंधुदुर्गमध्ये 3675 अॅक्टिव्ह रुग्ण असून केवळ 1015 इतक्याच बेड्सची व्यवस्था आहे. तसेच रत्नागिरीत सध्या 27 हजार 677 रुग्ण असून 19, 447 रुग्ण बरे झाले आहेत. तर 7772 रुग्ण उपचार घेत असून त्यांना बेड्सची कमतरता भासत आहे.

शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कुठेही दिसत नाहीत?

आरटीपीसीआर चाचणी बाबतही हीच परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. मात्र तरीही जिल्ह्यांत ही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावागावातील सेवाभावी संस्था कोकणवासीयांची सेवा करत आहेत. मात्र यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कुठेही दिसत नाहीत, असा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला.

एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्या?

दरम्यान, सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी. सर्व आमदार, खासदारांसह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे का असेन पण एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी, असे विनंती प्रसाद लाड यांनी केली आहे. (BJP MLA Prasad Lad criticize CM uddhav thackeray On Konkan Corona patient)

संंबंधित बातम्या : 

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

आधी Cowin अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांचं पत्र, मग पंतप्रधान मोदींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन

मोदी-ठाकरेंची फोनवर चर्चा; 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला गती येणार?

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.